![]()
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता स्वतः सक्षम व सुरक्षित राहावे आणि सजग नागरिक बनावे. शिक्षणासोबतच चांगले संस्कार, कायद्याचे पालन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप यांनी केले. लोहगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत १ जुलै रोजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या पैठण एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप यांनी विद्यार्थ्यांना विविध सामाजिक व कायदेशीर विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक, महिला शिक्षिका तसेच विद्यार्थीनींनी उपस्थित पोलीस अधिकारी व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, महिलांची व बालकांची सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, व्यसनमुक्ती तसेच कायद्याचे पालन याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यशाळेला पैठण एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सविता रगडे, दिनेश घोडके, मुखध्यापक, पालक, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनार्दन दराडे यांनी केले.
Source link
लोहगाव जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जनजागृती कार्यशाळा:लोहगाव जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जनजागृती कार्यशाळा