![]()
जुलैच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा खरीप पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चार लाख ३२ हजार १० हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी आतापर्यंत एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झा
.
यंदा शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाकडे वळत असल्याचे चित्र आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे मूग आणि उडीद या पिकांच्या पेरणीचा हक्काचा कालावधी आता संपला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आता जर शेतकऱ्यांनी मूग किंवा उडदाची पेरणी केली, तर वेळ निघून गेल्यामुळे हे पीक यशस्वी होणार नाही आणि उत्पादनात मोठी घट येईल. परिणामी, वेळेअभावी शेतकऱ्यांनी कापूस पिकाला सर्वाधिक पसंती दिली आहे. आतापर्यंत सुमारे ३० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. वेळेअभावी मूग आणि उडदाची पेरणी लांबल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवडीवर भर दिला आहे. आतापर्यंत झालेली पेरणी सुमारे १,२०,००० हेक्टर मुख्य कल : यंदा कापसाच्या एकूण क्षेत्रात मोठी वाढ होण्याचा अंदाज. गतवर्षी झालेली पेरणी चार लाख ३१ हजार ८८४ हेक्टर
तालुका पाऊस (मिमी) अकोट १६१.३ तेल्हारा १९१.७ बाळापूर १११.९ पातूर १४१.९ अकोला ९५.० बार्शीटाकळी १२४.९ मूर्तिजापूर १३२.९ जिल्हा सरासरी १३२.२
मूग, उडदाची पेरणी आता ठरणार तोट्याची मूग आणि उडीद या पिकांच्या पेरणीची योग्य वेळ आता निघून गेली आहे. कृषी विभागाच्या इशाऱ्यांनुसार, आता या पिकांची पेरणी केल्यास ती यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. तेल्हारा आणि पातूर परिसरातील अतिवृष्टीमुळे झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांना या पिकांचा पर्याय सोडून कापसाकडे वळावे लागत आहे.
अतिवृष्टीने काही भागांत पेरणीत व्यत्यय एकीकडे पेरणी वेगाने सुरू असली तरी दुसऱ्या बाजूला अकोट, तेल्हारा, पातूर तालुक्यांच्या काही भागात, विशेषतः पातूरच्या खालच्या भागात, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पेरणीच्या कामांना ब्रेक लागला आहे. शेतात पाणी साचल्यामुळे आणि सतत ओल राहिल्यामुळे या भागातील पेरणी प्रक्रिया काही प्रमाणात खोळंबली आहे.
पीक पेरणी (हे) टक्के तूर ६००,९५ १०० मूग १३४५ ४३ उडीद १३४७ ६० अन्नधान्य ६३,२०७ ९४ सोयाबीन २,२५,१५८ ९५ कापूस १,३६,८५८ १०६