![]()
अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावली आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने रायगड आणि पुण्याला ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. १. हवामान विभागाचा इशारा आणि राज्याची स्थिती २. मुंबईची दाणादाण; अंधेरी सबवे बंद ३. सांताक्रूझमध्ये मोठी दुर्घटना; झाड कोसळून ८ मजूर जखमी ४. लोणावळ्यात धुक्याची चादर; पर्यटकांची गर्दी एकीकडे मुंबईत पावसाचा हाहाकार सुरू असताना, दुसरीकडे लोणावळ्याचे निसर्गसौंदर्य मात्र आणखी खुलले आहे. मुसळधार पावसामुळे लोणावळा सध्या दाट धुक्याच्या चादरीत हरवून गेला आहे. घाटमाथ्यावरील डोंगररांगा आणि दऱ्या धुक्यात लपल्याने तयार झालेले मोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावले लोणावळ्याकडे वळू लागली आहेत. किंग्ज सर्कल परिसरात रिमझिम सरी मुंबईत गुरुवारी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून शहरातील विविध भागांत रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. किंग्ज सर्कल परिसरात सकाळपासून हलक्या सरी कोसळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुसळधार पावसाने नालासोपारा जलमय नालासोपारा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तुळींज पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हेही वाचा.. हिमाचलमध्ये भूस्खलन, गाड्या ढिगाऱ्याखाली:यूपीच्या लखनऊत घरात शिरले पाणी; गुजरातेत रस्ते पाण्यात, गाड्या पडत आहेत बंद हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसानंतर किन्नौरमधील चोलिंग येथे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली आणि ढिगाऱ्याखाली दोन वाहने गाडली गेली. राज्यातील ४९ रस्ते अद्यापही बंद आहेत. उत्तर प्रदेशात शुक्रवारी पहाटे ३ वाजता लखनौ, बाराबंकी, उन्नाव आणि जालौनसह पाच शहरांमध्ये पाऊस पडला. यामुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. गुजरातच्या वलसाडमध्ये रस्ते पाण्याखाली गेले. यामुळे अनेक वाहने चालवताना अचानक बंद पडली. सविस्तर वाचा
Source link
राज्यात मान्सूनची दमदार बॅटिंग:पुणे-रायगडला 'रेड' तर मुंबईला 'ऑरेंज' अलर्ट; सांताक्रूझमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी