Headlines

पुण्यात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे 2 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू:पावसाच्या पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात बुडून अंत, अज्ञात ठेकेदारावर गुन्हा




कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. घरासमोर खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडून सोहम लखन कसबे (वय 2) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घराबाहेर खेळताना क्षणार्धात घडला अनर्थ मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले होते. मात्र, काम सुरू असतानाही त्या खड्ड्यांभोवती कोणतेही बॅरिकेड्स, संरक्षक जाळी किंवा धोक्याचा इशारा देणारे फलक लावण्यात आले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे हे सर्व खड्डे पाण्याने पूर्ण भरले होते. त्यामुळे त्यांची खोली ओळखणेही अशक्य झाले होते. गुरुवारी दुपारी सोहम आपल्या घराबाहेर खेळत असताना नकळत या पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ गेला आणि त्यात पडला. पाण्यात बुडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आई स्वयंपाकात, चिमुकला क्षणात नजरेआड या घटनेने कसबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोहमची आई शिल्पा कसबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घडलेला प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, “मी घरात स्वयंपाक करत होते आणि सोहम घराबाहेर खेळत होता. काही वेळाने तो दिसेनासा झाल्याने मी भावाला विचारलं, पण त्यालाही तो दिसला नव्हता. त्यानंतर आम्ही सर्वत्र शोध घेतला. शेवटी जवळच पाण्याने भरलेल्या खड्ड्यात काठी टाकून पाहिलं, तेव्हा सोहमचा मृतदेह वर तरंगून आला.” यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले नाहीत? या प्रकरणात कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. परिसरात सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तब्बल चार मोठे खड्डे खोदण्यात आले होते. परंतु, त्याठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. खड्ड्याभोवती बॅरिकेड्स उभारणे, धोक्याचे फलक लावणे, दोरी किंवा पत्रे लावून परिसर सुरक्षित करणे आवश्यक असताना ते काहीच करण्यात आले नाही. पावसामुळे खड्डे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने ते सामान्य नागरिकांना किंवा लहान मुलांना दिसण्याची शक्यताही नव्हती. स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, काम पूर्ण न करताच कंत्राटदाराने खड्डे उघडे सोडले आणि याच बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप बालकाचा जीव गेला. अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या कामासाठी खड्डे खोदण्यात आले होते. मात्र, सुरक्षा नियमांचे पालन न झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला असून संबंधित कंत्राटदाराची ओळख पटवून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिकांमध्ये संताप, कठोर कारवाईची मागणी या घटनेनंतर संपूर्ण लोणी काळभोर परिसरात संतापाचे वातावरण आहे. नागरिकांनी प्रशासन आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात अशा उघड्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असताना संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पावसाळ्यातील सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर मुंबईतील उघड्या मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांत पुण्यात घडलेल्या या दुर्घटनेमुळे पावसाळ्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाच्या काळात उघडे खड्डे, मॅनहोल आणि अपूर्ण कामांभोवती योग्य सुरक्षा व्यवस्था न केल्यास अशा दुर्घटना टाळणे अशक्य असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, सोहमच्या मृत्यूमुळे कसबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. संबंधित बातम्या वाचा.. मुंब्र्यात हृदयद्रावक घटना:साचलेल्या पाण्यात करंट उतरल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप
मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर आता मुंब्र्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरल्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण मुंब्रा परिसर हादरून गेला असून, प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना:साचलेल्या पाण्यात पसरला हायव्होल्टेज करंट, दोन कॉलेज तरुणी गंभीर जखमी नवी मुंबईतील नेरूळमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एल.पी. ब्रिजसमोरील बिकानेर स्वीट्स परिसरात एका विद्युत वाहिनीमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरला. दुर्दैवाने, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या दोन कॉलेज तरुणी या विद्युतप्रवाहाच्या कचाट्यात सापडल्या आणि जागेवरच कोसळल्या. सविस्तर वाचा मुंबईत 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू:फोनवर बोलत चालली होती व्यक्ती, दुसऱ्या मॅनहोलमध्ये सापडला मृतदेह, 4 अधिकाऱ्यांचे निलंबन मुंबईत एकीकडे पावसाने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा राज्यात मान्सूनची दमदार बॅटिंग:पुणे-रायगडला ‘रेड’ तर मुंबईला ‘ऑरेंज’ अलर्ट; सांताक्रूझमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावली आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने रायगड आणि पुण्याला ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *