![]()
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आषाढी वारीच्या अवघ्या चार दिवस आधी थेट विधानसभेत गाजला आहे. नदीपात्रात रासायनिक आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे साबणासारखा पांढरा शुभ्र फेस साचल्याचे समोर आले आहे. या गंभीर परिस्थितीवरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत राज्य सरकारला धारेवर धरत, ‘नमामि इंद्रायणी’ योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदीनंतरही नदीची ही अवस्था का? असा संतप्त सवाल केला आहे. साबणाच्या पाण्यासारखी फेसाळली नदी; वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी देहू आणि आळंदी येथे दाखल होत आहेत. परंपरेनुसार लाखो भाविक इंद्रायणी नदीत स्नान करून हे पवित्र पाणी तीर्थ म्हणून ग्रहण करतात. मात्र, पिंपरी-चिंचवड हद्दीतून मोठ्या प्रमाणात जलपर्णी सोडल्यानंतर, सायंकाळी रसायनयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे आळंदीतील इंद्रायणी नदी रात्रभर फेसाने तरंगत होती. या केमिकलयुक्त प्रदूषणामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून वारकरी संप्रदायात चिंता व्यक्त होत आहे. ‘नमामि इंद्रायणी’चे कोट्यवधी रुपये गेले कुठे? – नाना पटोले विधानसभेत बोलताना नाना पटोले यांनी आरोप केला की, “शासनाने ‘नमामि इंद्रायणी’ योजना सुरू करून कोट्यवधी रुपयांची तरतूद केली. मात्र, आज नदी रासायनिक प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. औद्योगिक आस्थापने, एमआयडीसी तसेच गृहनिर्माण संस्थांकडून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता रासायनिक मिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात शासन अपयशी ठरले आहे.” नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केलेले 3 मुख्य मुद्दे: तात्काळ उपाययोजना: शासनाने इंद्रायणी नदीतील प्रदूषण तातडीने रोखण्यासाठी आतापर्यंत काय पावले उचलली आहेत? दोषींवर कारवाई: नदीत थेट केमिकल सोडणाऱ्या बेजबाबदार उद्योग, आस्थापना आणि एमआयडीसीवर सरकार काय कठोर कारवाई करणार? वारकऱ्यांची सुरक्षा: आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची काय कार्ययोजना आहे? हा प्रश्न महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानाशी आणि लाखो वारकऱ्यांच्या जिवाशी निगडित असल्याने या विषयावर सभागृहाने ‘सुओ मोटो’ लक्षवेधी स्वीकारावी किंवा अल्पकालीन चर्चा घडवून आणावी, अशी आग्रही विनंती पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. हेही वाचा.. पावसाळी अधिवेशन:इंद्रायणी प्रदूषणावरून नाना पटोले आक्रमक, हत्ती-कुत्र्यांच्या हैदोसावर चर्चा; सरकारकडून उपाययोजनांचे आश्वासन राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुसळधार पावसाचा आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मोठा फटका बसला. लक्षवेधी सूचनेच्या वेळी उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नसल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला, ज्यामुळे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले होते. मात्र, गदारोळ शमल्यानंतर विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले असून, चंद्रपूर-गडचिरोलीतील रानटी हत्तींचा हैदोस, जालन्यातील भटक्या कुत्र्यांचे हल्ले, कंत्राटदारांचे सेफ्टी ऑडिट आणि ‘बेस्ट’ उपक्रमाला आर्थिक मदतीचा मुद्दा आमदारांनी आक्रमकपणे मांडला. सविस्तर वाचा आषाढी वारीसाठी मानाच्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान:सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, यासाठी २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिली. राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक समतेची ओळख आहे. लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असतात. वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने २०२४ मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केले असून, त्यामार्फत सलग तिसऱ्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. सविस्तर वाचा
Source link
वारीच्या तोंडावर पवित्र इंद्रायणी नदी फेसाळली:नाना पटोले विधानसभेत आक्रमक; 'नमामि इंद्रायणी'च्या कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह