Headlines

भोंदू अशोक खरातसोबत राजकीय नेत्यांचेही व्हिडिओ:हे सर्व उघडपणे समोर यायला हवे, आमदार रोहित पवारांची मागणी




नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांवर केलेले लैंगिक अत्याचार आणि त्याचे समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले संतापजनक व्हिडिओ यामुळे संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या गंभीर प्रकरणाची आता एसआयटी मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही मोठ्या प्रमाणावर उमटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आणल्याने खळबळ आणखी वाढली आहे. रोहित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, या प्रकरणात केवळ सामान्य लोक किंवा अराजकीय व्यक्तींचे नव्हे तर राजकीय नेत्यांचेही व्हिडिओ आहेत. खरातसोबत राजकीय लोकांचेही व्हिडिओ आहेत का? असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला. तसेच या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. खरातसोबत राजकीय नेत्यांचेही व्हिडिओ पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, नाशिकमध्ये 35 हनी ट्रॅप प्रकरणे समोर आली आहेत. त्यात काय कारवाई झाली? संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणला गेला का? काही अधिकाऱ्यांना गप्प केले गेले का? हे व्हिडिओ बाहेर कसे आले? हे सामान्य लोकांचे व्हिडिओ आहेत असे सांगितले जाते, पण खरेतर यात राजकीय लोकांचे व्हिडिओ आहेत. कोणाचे आहेत, कोण कोण त्यांच्यासोबत होते, हे सर्व उघडपणे समोर यायला हवे. रोहित पवारांची भाजपवर टीका रोहित पवारांनी भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले की, भाजप नेहमी आपल्या मित्र पक्षांना संपवण्यासाठी असे प्रकार करते. नितीश कुमारचे काय झाले? साताऱ्यात काय चालले आहे? आता जर चौकशी करायची असेल तर सगळ्यांना करा. सर्व नेत्यांची चौकशी व्हायला पाहिजे. त्या गेल्या पण इतर लोक का बाहेर येत नाही. एसआयटीचा चुकीचा वापर लोक करत असतील, काही लपवत असतील, काही नेते म्हणत आहेत की आमच्या लोकांचे व्हिडिओ पुढे येऊ देऊ नका. एसआयटीचा वापर सिस्टम क्लियर करण्यासाठी करा, असेही पवार म्हणाले. खरातच्या जमिनी विका आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरा अशोक खरातच्या जमीन व्यवहार प्रकरणी रोहित पवार म्हणाले, समृद्धी मार्ग कसा जाणार हे माहीत असल्याने काही राजकीय लोकांनी जमिनी घेतल्या. खरातला आतून माहिती मिळाली त्यामुळे भोंदूबाबाचाही फायदा झाला. खऱ्या शेतकऱ्याचा या समृद्धी महामार्गाला विरोध होता. आता जे खरे शेतकरी आहेत त्यांचा शक्ती मार्गाला विरोध आहे. तसेच पुढे रोहित पवार म्हणाले, खरातच्या जमिनी विका आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरा, पण लवकर करा, असेही त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *