Headlines

भोंदू खरातला 1825 बड्या आसामींचे कॉल:नावे ऐकूण हादरा बसेल, अंजली दमानिया यांचा दावा; बुधवारी करणार मोठा खुलासा




सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात दोन दिवसांत मोठा खुलासा करण्याची ग्वाही दिली आहे. भोंदू अशोक खरातला 1825 मोठ्या आसामींचे कॉल आले होते. यात राकारणी, आयजी व तहसीलदारांसह अनेकांची नावे आहेत. त्यांची नावे ऐकूण सर्वांनाच हादरा बसेल. मी या प्रकरणी दोन दिवसांत मोठा खुलासा करेल, असे त्या म्हणाल्यात. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे रान पेटले आहे. या प्रकरणात अनेक राजकाण्यांची नावे समोर आल्यामुळे एकच हल्लकल्लोळ माजला आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणी पुढील दोन दिवसांत मोठा खुलासा करण्याची घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या, मी येत्या बुधवारी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात अशोक खरातचे सर्व कारनामे सांगणार आहे. आताच्या घटकेला माझ्याकडे जी माहिती व एक्सेलशिट आहे, त्यात 1825 नंबर आहेत. या लोकांनी अशोक खरातला कॉल केले व खरातने त्यांना कॉल केले. सर्वात धक्कादायक म्हणजे या नंबर्समध्ये आयजी पातळीवरील अधिकारी, पीआय, सीनिअर पीआय, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर व राजकारण्यांचाही समावेश आहे. त्यांची नावे ऐकूण तुम्हा सर्वांना धक्का बसेल. या व्यक्तीची पोहोच किती मोठी आहे हे खरेच कळत नाही. कारण, यात ट्रॅफिक हवालदारापासून पोलिस ठाण्यातील असंख्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही संपूर्ण माहिती आता पोलिस अधिकाऱ्यांना पाठवली आहे. पण बुधवारी मी याचा नक्की खुलासा करेन. प्रतिभा चाकणकरांच्या चौकशीवरही भाष्य अंजली दमानिया यांनी यावेळी रुपाली चाकणकर यांच्या भगिणी प्रतिभा चाकणकर यांच्या चौकशीवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, भोंदू अशोक खरात प्रकरणात अजूनही असंख्य खुलासे होतील. विशेषतः आज प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. त्यांची जी माहिती होती ती अफाट आहे. त्यांचे कॉल्स कमी होते, पण त्यांचे एसएसएमस प्रचंड प्रमाणात होते. म्हणजे हे सर्व व्यवहाराचे मेसेज होते. काही महत्त्वाच्या डिटेल्स मी शिर्डी पोलिस ठाण्याला पाठवल्या आहेत. ईडीची खरातच्या 11 ठिकाणांवर छापेमारी दुसरीकडे, ईडीने आज अशोक खरातच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केली. अंजली दमानिया यांनी यावरही भाष्य केले. ईडीची सध्या 11 ठिकाणी चौकशी सुरू आहे. रोज नवनवे खुलासे होत आहेत. हे पाहून अतिशय धक्का बसतो. अशोक खरातचा ठाण्याशीही संबंध आढळला आहे. मी या प्रकरणी बुधवारी गुगल मॅपसह खुलासा करेल, असे अंजली दमानिया म्हणाल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *