Headlines

संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक: 99.53% विक्रमी मतदान:1053 पैकी 1048 मतदारांनी बजावला हक्क, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला




छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शनिवारी विक्रमी ९९.५३ टक्के मतदान झाले. एकूण १०५३ मतदारांपैकी १०४८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नियोजन केले होते. भाजपने मतदारांशी संपर्क साधण्यासाठी विशेष यंत्रणा राबवली, ज्यात प्रत्येक नगरसेवकाला पाच मतदारांशी संपर्क साधण्याचे निर्देश होते. आमदार, खासदार आणि मंत्री दिवसभर मतदान केंद्रांवर उपस्थित होते. मतदान सुरू झाल्यापासून सकाळी आठ वाजल्यापासूनच दोन्ही आघाड्यांचे प्रमुख नेते मतदान केंद्रांवर ठाण मांडून होते. यामध्ये खासदार कल्याण काळे, ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, आमदार अंबादास दानवे, जगन्नाथ काळे आणि अभिजित देशमुख यांचा समावेश होता. खासदार संदीपान भुमरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्रपणे मतदारांशी संपर्क साधला. भाजपच्या वतीने माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि माजी आमदार संजय केणेकर यांनी मतदान स्थळाला भेट दिली. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये देखील दिवसभर उपस्थित होते. भाजपचे सर्व नगरसेवक बुथवरील यंत्रणा सांभाळत होते. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी ‘महायुतीचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील’ असा दावा केला आहे, तर खासदार कल्याण काळे यांनी ‘महाविकास आघाडीचाच विजय होईल’ असा विश्वास व्यक्त केला आहे. मतमोजणी उद्या होणार असून, त्यानंतरच अंतिम निकाल स्पष्ट होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *