![]()
टाकरखेडा शंभू येथील सहाय्यक कृषी अधिकारी रुपाली ठाकरे-चऱ्हाटे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील वरळी येथे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते रुपाली ठाकरे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मृदा व जलसंधारण मंत्री इंद्रनील नाईक, राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह आणि कृषी आयुक्त सुरज मांढरे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. सन २००४ पासूनच्या २२ वर्षांच्या सेवाकाळात रुपाली ठाकरे यांनी कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी कृषी विस्तार, शेतकरी प्रशिक्षण, महिला शेती शाळा, जलसंधारण आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार यामध्ये विशेष कार्य केले आहे. यापूर्वीही त्यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट अधिकारी, राज्यस्तरीय कृषी मित्र पुरस्कार आणि कृषीथॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या यशाबद्दल रुपाली ठाकरे यांनी शेतकरी, वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि कुटुंबीयांचे आभार मानले. त्यांच्या सहकार्यामुळेच हा सन्मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Source link
कृषी अधिकारी रुपाली ठाकरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार:'पद्मश्री विखे पाटील कृषी सेवारत्न' पुरस्काराने सन्मानित