![]()
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी कारागृहात असलेले संशयित आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. एका नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश अमित खारकर यांनी हा निर्णय दिला. अशा परिस्थितीत संशयितांना जामीन दिल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात आणि पीडितांना धमकावू शकतात, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला, तो कोर्टाने ग्राह्य धरला. ९ गुन्हे आणि परदेशात पाठवण्याचा कट एका नामांकित आयटी कंपनीत युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतराकरिता नाव बदलून तिला परदेशात पाठवण्याचा कट रचल्याप्रकरणी देवळाली कॅम्प व मुंबई नाका पोलिस ठाण्यात वेगवेगळे ९ गुन्हे दाखल आहेत.
Source link
नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला