![]()
गडचिरोलीच्या जंगलात लोकांना आता एका नव्या थराराचा अनुभव घेता येणार आहे. कमलापूर हत्ती कॅम्पमधील पाळीव हत्तींनंतर आता छत्तीसगडमधून आलेल्या रानटी हत्तींचा मुक्त वावर लोकांना ते जाता -येताना पाहता येणार आहे. मात्र, त्यासाठी कमालीची सावधगिरी बाळगावी लागणार आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये आलेल्या 23 वन्य हत्तींच्या कळपात नव्या पिल्लांचा जन्म झाल्याने ही संख्या आता 32 वर पोहोचली असून यात 21 मादी, 9 पिल्ले आणि 2 टस्कर (नर) हत्तींचा समावेश आहे. गडचिरोलीतील मुबलक बांबू, चारा आणि पाण्याच्या सोयींमुळे हा कळप आता येथेच कायमचा स्थिरावल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या रानटी हत्तींचा कळप गडचिरोली, वडसा (देसाईगंज), धानोरा, कुरखेडा तसेच चंद्रपूरच्या सीमाभागात नियमितपणे वावरत असून वैनगंगा नदी आणि तिच्या उपनद्यांलगतचे वनक्षेत्र हे त्यांच्या हालचालीचे प्रमुख मार्ग बनले आहे. या रानटी हत्तींना मानवी वस्त्यांपासून दूर ठेवण्यासाठी वन विभागाने पश्चिम बंगालमधील विशेष “हुल्ला पार्टी’सह थर्मल ड्रोन, एआय प्रणाली आणि लाइव्ह सीसीटीव्ही यंत्रणा सक्रिय केली आहे. हत्तींना मानवी वस्त्यांपासून दूर ठेवण्यासाठी पश्चिम बंगालमधून 15 प्रशिक्षित लोकांची विशेष “हुल्ला पार्टी’ तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हत्तींना नैसर्गिक मार्गाने सुखरूप जाऊ द्यावे “रानटी हत्ती हे पाळीव हत्तींसारखे नसून ते अत्यंत संवेदनशील आणि आक्रमक असतात. त्यामुळे जंगलात किंवा गावाजवळ रानटी हत्ती दिसल्यास त्यांच्या कधीही जवळ जाण्याचा किंवा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये. हत्तींपासून नेहमी सुरक्षित अंतर ठेवावे आणि त्यांना डिवचण्याचा प्रयत्न न करता त्यांच्या नैसर्गिक मार्गाने जाऊ द्यावे. – गणेश पाटोळे, विभागीय वन अधिकारी, व्हिजिलन्स, वडसा वन विभाग कधी आले, कुठे गेले?
Source link
छत्तीसगडचे हत्ती गडचिरोलीमध्येच स्थिरावले:संख्या 23 वरून 32 वर, सुरक्षेसाठी वन विभागाची हायटेक यंत्रणा सक्रिय