![]()
छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील गोलटगाव फाटा परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका २२ वर्षीय तरुणाने भरधाव अज्ञात वाहनासमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पवन कडूबा बुचुडे (वय २२, रा. शेवगा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे जाणाऱ्या एका वेगवान अज्ञात वाहनासमोर पवनने अचानक उडी घेतली. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी पवनला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पवनच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. करमाड पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत असून, करमाड पोलिस ठाण्यातील जमादार संतोष चव्हाण, सोपान डकले व शाम ढवळे पुढील तपास करत आहेत.
Source link
भरधाव वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या:कारण अस्पष्ट, गोलटगाव फाटा परिसरातील घटना