Headlines

डॉक्टरांनी मानवी मूल्यांना प्राधान्य देत व्यवसायाचे पावित्र्य जपावे- डॉ. दौंड:पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालयात ‘डॉक्टर्स दिन’ उत्साहात साजरा‎




डॉक्टर हा केवळ एक व्यवसाय किंवा उपजीविकेचे साधन नसून मानवतेची सेवा, करुणा, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव जपणारा एक पवित्र मार्ग आहे. आजच्या काळात काही ठिकाणी वैद्यकीय क्षेत्र आर्थिक फायद्याशी जोडले जात असल्याचे चित्र आहे, ही बाब चिंताजनक आहे. डॉक्टरांनी आर्थिक लाभापेक्षा रुग्णांची सेवा आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देत आपल्या व्यवसायाचे पावित्र्य जपले पाहिजे, असे परखड प्रतिपादन पाचोड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास दौंड यांनी केले. शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘डॉक्टर दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. भगवान जायभाय यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. तुकाराम गावंडे यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. शिवाजी यादव, डॉ. सुरेश नलावडे, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. हेमंतकुमार जैन उपस्थित होते. गरजूंच्या सेवेतच डॉक्टरकीचे खरे समाधान अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे म्हणाले की, “गरीब, गरजू आणि वंचित रुग्णांची सेवा करण्यामध्येच डॉक्टरकीचे खरे समाधान आहे. आजार दूर करण्यासाठी डॉक्टरांनी मानवी सेवेचे व्रत स्वीकारणे ही काळाची गरज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *