Headlines

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपूरला दिली पहिलीच भेट:बळीराजा सुखी तर संसार सुखी, पाऊस पडू दे; सुनेत्रा पवारांचे विठ्ठलाला साकडे



बळीराजा सुखी झाला तरच जगाचा संसार सुखी होतो. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरात लवकर चांगला पाऊस पडू दे, राज्यातील माझा शेतकरी सुखी आणि समाधानी राहू दे, असे साकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी घातले. उपमुख्

.

मंचर तालुक्यातील एका मठाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते शनिवारी झाले. यानिमित्ताने त्यांचा दौरा होता. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार संजय शिंदे, नगराध्यक्षा प्रणिती भालके, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

पंढरपूरच्या विकासाबाबत मोठी घोषणा करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, पंढरपुरातील महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर आराखड्याला मंजुरी मिळालेली आहे. येत्या काही दिवसांतच या कॉरिडॉरचे काम प्रत्यक्ष सुरू होईल. या विकास कामांमुळे भविष्यात प्रत्येक भाविकाला विठुरायाचे एक नवे आणि भव्य पंढरपूर पाहायला मिळेल. या कॉरिडॉरमुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी प्रशस्त सुविधा, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आणि स्वच्छ, सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. वारीसह वर्षभर पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले . श्री विठ्ठल दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना श्रीमती पवार यांनी “पंढरपूरला विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला आल्यानंतर अतिशय आनंद आणि आत्मिक समाधान मिळते. आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे. भाविकांचा हा भक्तीचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित व्हावा, यासाठी प्रशासनाला चोख व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. याशिवाय आरोग्य सेवा, आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. . पंढरपुरातील मंचर वारकरी भक्त निवासच्या उद्घाटन सोहळ्यानंतर त्यांनी व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवून थेट सामान्य वारकऱ्यांच्या पंगतीत बसून मठातील उपलब्ध प्रसादाचा आस्वाद घेतला. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत नम्रतेने आणि साधेपणाने आपल्यासोबत जमिनीवर पंगतीत बसून जेवल्याचे पाहून उपस्थित वारकरी अचंबित झाले. . यावेळी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. . उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत कामांची पाहणी करुन माहिती घेतली. यावेळी त्यांनी विविध कामांच्या दर्जावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या.

भाविकांचा भक्तीचा प्रवास सुरक्षित व्हावा, प्रशासनाला सूचना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *