![]()
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत पात्र न ठरणाऱ्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत दिली जाते. परंतु ज्या गरजू रूग्णांना या दोन्ही मदतीचे लाभ मिळत नाहीत अशा रूग्णांना डॉक्टरांनी धर्मादाय रुग्णालयांमध्ये रेफर केल्यास आपण त्यांच्या मोफत इलाजाची सोय करून देणार असल्याची ग्वाही माढा-पंढरपूर मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली. ते माढा येथील डॉ मस्के हॉस्पिटल येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ब्लड बॅंकेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी राजेंद्र चवरे, आनंदराव कानडे, शहाजी चवरे, डॉ हनुमंत क्ष॑॑ीरसागर, डॉ अभयकुमार लुणावत, दिनेश जगदाळे व मान्यवर उपस्थित होते. खासगी रुग्णालयांनी सरकारी योजनांचा लाभ जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक महिन्यात किमान दोन गावांमध्ये हेल्थ चेकअप व जनजागृती शिबिर घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. खासगी रुग्णालयांना ‘चेकअ’प चे आवाहन
Source link
योजनांचा लाभ न मिळणाऱ्या रूग्णांवर धर्मादायमध्ये मोफत उपचार करणार:आमदार अभिजीत पाटील यांची ग्वाही