Headlines

मुस्लिम मुंबईचे षडयंत्र हाणून पाडा:मुंबईत 5 वर्षांत 3.36 लाख हिंदू तर 2.20 लाख मुस्लिम बालकांचा जन्म, सोमय्यांनी आकडेवारीवर व्यक्त केला संशय




भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या जन्मदरावरून एक मोठा आणि वादग्रस्त मुद्दा उपस्थित केला आहे. मुंबईतील बदलत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करत त्यांनी या प्रकरणाच्या सखोल अभ्यासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक विशेष ‘डेमोग्राफिक’ समिती गठीत करण्याची मागणी केली आहे. पोस्टमध्ये सोमय्यांनी 2025 मधील मुलांच्या जन्माची आकडेवारी सादर केली आहे. या अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईत 70,380 हिंदू मुलं आणि 48,554 मुस्लिम मुलं जन्माला आली असून, जन्मदराचे प्रमाण सुमारे 3:2 एवढे आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीचाही हवाला दिला आहे. मात्र, या शासकीय आकडेवारीविषयी त्यांनी तीव्र शंका उपस्थित केली असून, यामागे मुंबईचे स्वरूप बदलण्याचा काही घातपात किंवा डाव असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करावी मुंबईतील काही विशिष्ट भागांमधील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचा दावा करत सोमय्यांनी भविष्यात ‘मुस्लिम मुंबई’ होण्याची शक्यता वर्तवली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी राज्य सरकारने जन्मदराविषयीची अधिकृत आणि पारदर्शक माहिती जाहीर करावी, तसेच या डेमोग्राफिक बदलांचा अभ्यास करण्यासाठी तातडीने एक विशेष समिती स्थापन करावी, अशी आक्रमक मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. हे ही वृत्त वाचा

निदा खानला संभाजीनगरमध्ये आश्रय देण्याचे कारस्थान जलील यांचेच:मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप, म्हणाले – त्यांना जेलमध्ये जावेच लागणार!
निदा खान हिला नाशिकमधून पळवून मुंब्रा येथे घेऊन जाणे, तेथून छत्रपती संभाजीनगरमध्ये आणणे आणि जवळपास 35 दिवस तिच्यासह तिच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था करण्यामागे मुख्य आरोपी इम्तियाज जलील हेच आहेत. त्यांचा जो नगरसेवक आहे, तो केवळ एक मोहरा असून हे सर्व कारस्थान इम्तियाज जलील यांचेच आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, आता त्यांना तुरुंगात जावे लागणार आहे, असा दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, धर्मांतर करण्यासाठी नाशिक, पुणे, नागपूर, संभाजीनगरसह कोकणातील काही भागांत टोळ्या कार्यरत असून मोठे षडयंत्र रचले जात आहे. राज्य सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले असून पोलिसांकडून याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *