Headlines

कर्जतच्या वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे आक्रमक:म्हणाले- जसं एखादं संकट टळावं म्हणून देवाला पाण्यात ठेवतो, तसं मुख्यमंत्र्यांनाच आता पाण्यात ठेवूया




पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि झाडांच्या संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेणारे प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे आता कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात थेट मैदानात उतरले आहेत. कर्जतमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीची ते पाहणी करत आहे. ‘कोणत्याही परिस्थितीत हे जंगल तोडू द्यायचे नाही,’ अशी ठाम भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. उपोषणाला बसलेल्या तरुणांची घेतली भेट कर्जतमध्ये सुरू असलेल्या या वृक्षतोडीच्या निषेधार्थ परिसरातील काही तरुण गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहे. सयाजी शिंदे यांनी थेट उपोषणस्थळी जाऊन या तरुणांची भेट घेतली. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतानाच, त्यांनी या तरुणांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या तरुणांशी बोलताना त्यांनी दिलेला लढा पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. ‘मुख्यमंत्र्यांनाच पाण्यात ठेवूया’ एका वृत्तवाहिनीशी बोलताना सयाजी शिंदे यांनी आपल्या मिश्किल शैलीत सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, “आपण जसं घरात एखादं संकट टळावं म्हणून देवाला पाण्यात ठेवतो, तसं आता आपल्या मुख्यमंत्र्यांनाच आपण पाण्यात ठेवूया! आणि त्यांना सांगूया की, हे जे जंगलावर आणि पर्यावरणावर संकट आलंय, त्यातून तुम्हीच आम्हाला वाचवा.” ‘हे जंगल तोडू द्यायचे नाही, हीच भूमिका’ वृक्षतोडीच्या भीषण वास्तवावर भाष्य करताना सयाजी शिंदे म्हणाले, “आज आम्ही या संपूर्ण वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी इथे आलो आहोत. इथे मोठ्या प्रमाणावर निसर्गाची हानी होत आहे. पण, हे जंगल अजिबात तोडू द्यायचे नाही, हीच आमची सर्वांची ठाम भूमिका आहे.” या संपूर्ण प्रकरणावर पुढील रणनीती ठरवण्यासाठी सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला परिसरातील ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असून, कर्जतच्या वृक्षतोडीचा मुद्दा आता राज्य पातळीवर तापण्याची चिन्हे आहेत. ————- हेही वाचा.. भाजपला लोकसभेत 36 खासदार कमी म्हणून विलीनीकरणाच्या अफवा: संजय राऊत म्हणाले- अजित पवार गटात ज्येष्ठ नेत्यांचा आता कोणताही मानसन्मान राहिलेला नाही “अजित पवार गटात ज्येष्ठ नेत्यांचा आता कोणताही मानसन्मान राहिलेला नाही. पक्षात कोणी कितीही मोठ्या पदावर असले तरी पक्षाची सर्व सूत्रे आता पार्थ पवार यांच्याकडेच आहेत; त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या वरिष्ठ नेत्यांना आता पार्थ पवारांच्या हाताखालीच काम करावे लागत आहे. स्वतःच्या पक्षात प्रचंड अडचणीत आल्यामुळेच हे नेते आता विलीनीकरणाची भाषा बोलत आहेत. मात्र, केवळ तुम्हाला सत्ता मिळावी म्हणून आदरणीय शरद पवार साहेब भाजपसोबत जातील, असे कदापि होणार नाही,” असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *