![]()
शनिवारी संध्याकाळी महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीशी संबंधित चिंताजनक बातम्या समोर आल्या. वृत्तानुसार, प्रकृती बिघडल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी केबीसीचे चित्रीकरण थांबवले आहे. आता बिग बी यांनी रविवारी पहाटे भावुक अंदाजात चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पोस्ट केली. तसेच त्यांनी आपल्या हातात त्रास होत असल्याचे सांगितले. अमिताभ बच्चन यांनी अधिकृत ब्लॉगमध्ये लिहिले, सर्वांना दीपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि चतुर्दशीच्याही शुभेच्छा, प्रेम, आदर आणि शुभमंगलाच्या प्रार्थना. ईश्वराची कृपा सदैव आपल्याला घेरून राहो. पुढे अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की, त्यांना इतक्या शुभेच्छा आणि भेटवस्तू मिळतात की आता त्या ठेवण्यासाठीही त्यांच्याकडे जागा कमी पडू लागली आहे. त्यांनी लिहिले, मी माझ्या परीने भेटवस्तू पाठवणाऱ्यांना पत्र लिहून उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतः उत्तर द्यायचे आहे, पण ज्या हाताने लिहितो, तो हात हलवताना त्रास होत आहे. उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. ब्लॉगच्या पुढील भागात त्यांनी लिहिले आहे की, गेल्या काही दिवसांपासून अशी परिस्थिती निर्माण होत आहे की, त्यांना वारंवार माफी मागावी लागत आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांनी अधिकृत X अकाउंटवरून आणखी दोन पोस्ट शेअर केल्या. पहिल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘हो हो, झाले.’ आणि दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले, ‘आणखी काय? बस.’ दावाः तब्येत बिघडल्यामुळे केबीसीचे शूटिंग थांबवण्यात आले वृत्तसंस्था आयएएनएसने कौन बनेगा करोडपतीशी संबंधित सूत्राच्या हवाल्याने लिहिले आहे की, अमिताभ बच्चन यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती. त्यामुळे शोच्या नवीन भागांचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. वृत्तानुसार, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर अमिताभ बच्चन लवकरच नवीन भागांचे चित्रीकरण करतील. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग शेअर करून आपण दिनचर्येवर परतण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
Source link
तब्येत बिघडल्याच्या बातम्यांदरम्यान भावुक पोस्ट:अमिताभ बच्चन म्हणाले- हातात वेदना, लिहिता येत नाही; दावा- KBC चे शूटिंग थांबवण्यात आले