राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट असून शेतकरी संकटात आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी राज्य सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांकडून जिथे जिथे जबरदस्तीने कर्जवसुली केली जाईल, तिथे महसूल मंत्रालय आणि मुख्यम
.
प्रवीण दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मोठा मानसिक आधार मिळत आहे.
अजितदादा काम करणारा नेता
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत प्रवीण दरेकर म्हणाले की, यावर पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य वेळी अधिकृत भाष्य करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. दिवंगत नेते अजित पवार यांची ओळख एक अत्यंत धडाडीचा आणि काम करणारा नेता अशीच होती. मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलेल्या भावना आज संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहेत. शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, त्यांच्या शेतात पिके फुलावीत आणि राज्य सुजलाम-सुफलाम व्हावे, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे सांगत दरेकर यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
हे ही वृत्त वाचा
महाराष्ट्रात रोज 8 शेतकऱ्यांची आत्महत्या, हा आकडा भयानक:नेत्यांच्या फायद्यासाठी डेटा सेंटर लादू नका, रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

एआय डेटा सेंटरमुळे ट्रम्प यांच्या पक्षाचा अमेरिकेत पराभव झाला आहे. तिथल्या लोकांनी सुद्धा या प्रकल्पाला नाकारले आहे. हा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी, लाईटचा वापर केला जातो, आणि त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी पाण्याचे नियोजन न केल्याने सर्व पाणी कर्नाटकमध्ये गेले आहे. इथे लोकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळणार नाही. ऊजणीतच पाणी राहिले नाही तर लोकांना पाणी मिळणार कुठून? असा सवाल पवारांनी केला आहे. केवळ नेत्यांना सपोर्ट करण्यासाठी एआय डेटा सेंटरचे समर्थन जर भाजपचे नेते करत असतील तर ते फार घातक आहे. सोलापूरचा एक जण डेंटा सेंटरमध्ये गुंतवणूकदार असून सर्व नेते त्यांच्या जवळ आहेत. वाचा सविस्तर