![]()
पुण्यातील मुकुंदनगर येथील पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात तपासाला वेग आला असून, पोलिसांनी झांबरेंच्या घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांच्या पोलिस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पती अक्षय झांबरे, सासरा अरविंद झांबरे आणि सासू मंगल झांबरे यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे ॲड. भाग्यश्री डागळे-संचेती तर मूळ फिर्यादीतर्फे ॲड. पुष्कर पाटील आणि ॲड. ऋतुराज पाटील यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने तिघांच्याही पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी झांबरे यांच्या घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, आरोपींचे मोबाईल, मृत पायल यांचा मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. दरम्यान, गुन्ह्यातील सहआरोपी अक्षता झांबरे ऊर्फ निमन हिचा शोध पोलिसांकडून सुरू असून, अद्याप 15 तोळे सोने मिळायचे बाकी आहे. नेमकी घटना काय? पुण्यातील मुकुंदनगर येथील अक्षय हाईट्स सोसायटीमधील फ्लॅटमध्ये 2 नोव्हेंबर रोजी पायल अक्षय झांबरे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी गळफास घेतल्याचा संशय होता. स्वारगेट पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, या घटनेची माहिती मिळताच माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचे गंभीर आरोप करत, हा आत्महत्येचा नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. डॉ. नीलम गोऱ्हेंनी पायल झांबरेंच्या कुटुंबाची भेट घेतली पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर परिसरातील श्रीरामनगर येथे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पायल झांबरे यांच्या माहेरी जाऊन पवार कुटुंबीयांची भेट घेतली. पायल यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि घटनेची माहिती घेतली. न्याय मिळेपर्यंत कुटुंबीयांच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक दिवाळीत हुंड्यासाठी छळ झालेल्या मुलींच्या मृत्यूच्या घटना समोर येणे ही वेदनादायी बाब असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. महाराष्ट्रात एकही मुलगी हुंड्याची बळी ठरू नये, अशी लक्ष्मीपूजनावेळी प्रार्थना करते. एकही हुंडाबळी न घडणारी दिवाळी हीच आपल्यासाठी खरी दिवाळी असेल, असे त्यांनी सांगितले.
हे ही वृत्त वाचा
हे सरकार रडीचा डाव खेळत असून सर्व कामकाज संविधानविरोधी:कारखाने कसे चालतात हे नसणाऱ्यांना काय उत्तर देणार?; राऊतांच्या टीकेवर रोहित पवारांचा टोला
अशा दुष्काळी परिस्थितीत आम्ही घरी दिवाळी साजरी न करता, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसोबत साजरी करत आहोत. उद्याचे गोकुळ दूध संघासंदर्भातील आंदोलन अधिक तीव्र होईल. हे सरकार रडीचा डाव खेळत असून सर्व कामकाज संविधानविरोधी सुरू आहे. सरकारच्या विरोधात आलेला निकाल त्यांनी स्वीकारला पाहिजे. यावेळी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मूळ मुद्द्यावरून दुसरीकडे विषय न वळवता विचार करून बोलावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
Source link