![]()
जिल्ह्यातील आपल्या मातीतील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची समाजाला ओळख व्हावी. त्यांच्या संघर्षातून आणि यशातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी. या उद्देशाने स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनच्या ‘अकोलारत्न पुस्तक प्रकाशन, अकोलारत्न सन्मान सो
.
सोहळ्यात जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, कृषी, साहित्य, उद्योग, कला आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३० मान्यवरांना ‘अकोलारत्न पुरस्कार-२०२६’ प्रदान करून गौरवण्यात आले. . त्यांच्या अनुभवातून आणि संघर्षातून युवा पिढीला प्रेरणा मिळावी. राष्ट्रीय व्याख्याते प्रा. राजेश शंकरराव ताले यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. रणजित सपकाळ यांनी ‘अकोलारत्न’ या संकल्पनेचे विशेष कौतुक केले. स्वामी विवेकानंद ग्रुपने राबवलेला हा उपक्रम अभिनव आहे. हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींचे योगदान त्यांच्या गावापुरते किंवा कार्यक्षेत्रापुरते मर्यादित राहते. अशा व्यक्तींच्या कार्याची समाजाला व्यापक ओळख करून देणे गरजेचे आहे.