![]()
नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण व्हावी. प्लास्टिकचा वापर टळावा. शाडू मातीच्या मूर्तींसह नैसर्गिक सजावटीला प्रोत्साहन मिळावे. या उद्देशाने अकोट नगरपरिषदेच्या वतीने आयोजित “पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२६” मधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. नगरपरिषदेच्या वतीने ७ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सहभागी स्पर्धकांमधून उत्कृष्ट, पर्यावरणपूरक सजावट करणाऱ्यांची निवड परीक्षक समितीमार्फत करण्यात आली. या विजेत्यांचा गौरव करण्यात आला. इतरांनाही प्रेरणा मिळावी. यासाठी विशेष पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा नगराध्यक्ष माया धुळे, उपनगराध्यक्ष प्रथमेश बोरोडे, अकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर, आरोग्य सभापती मनीष कराळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. यात प्रथम क्रमांकासाठी ११ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार, तर तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. या पारितोषिकांचे प्रायोजकत्व मुख्याधिकारी शशिकांत मारोती बाबर, नगराध्यक्ष माया धुळे, लेखाधिकारी सुधीर भदाडे यांनी स्वीकारले होते. उपस्थितांनी प्रायोजकांचे आभार मानले. सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. भविष्यातील सण-उत्सवांतही असाच सहभाग नोंदवावा. असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले. प्रथम क्रमांक (११ हजार रुपये) हा शुभांगी सुरेंद्र काळे यांनी पटकावला आहे. या पारितोषिकाचे प्रायोजक हे मुख्याधिकारी शशिकांत बाबर आहेत. द्वितीय क्रमांक (७ हजार रुपये) सिद्धेश विजय जुनघरे यांनी पटकावला असून, या पुरस्काराचे प्रायोजक या नगराध्यक्षा माया धुळे आहेत. तृतीय क्रमांक (५ हजार रुपये) जयश्री निलेश सोनटक्के यांनी पटकावला असून, याचे प्रायोजक सुधीर भदाडे, लेखाधिकारी हे आहेत.
Source link
न.प.तर्फे पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सवातील विजेत्यांचा गौरव:शाडू माती, नैसर्गिक सजावटीला प्रोत्साहन; रोख पारितोषिके देऊन स्पर्धकांचा सन्मान