Headlines

श्रीराम मंदिर ट्रस्टची आज बैठक:चंपत राययांच्यासह 3 विश्वस्तांच्या सुरक्षा वाढीवर विचार, देणगी चोरीप्रकरणी राजीनामे, चौकशी व नवीन व्यवस्थेवर निर्णय शक्य



राम मंदिराच्या कथित देणगी चोरी प्रकरणातील खुलाशांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक होणार आहे. तत्पूर्वी, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, विश्वस्त अनिल मिश्र आणि मंदिर निर्मितीच्या कामाशी संबंधित गोपाल राव य

.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांचीही सुरक्षा वाढवण्यासोबतच काही काळासाठी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्यावर खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घातली जाऊ शकते. चंपत राय २६ जून रोजी राजीनामा दिल्यानंतर ना कोणाला भेटत आहेत ना मीडिया त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला आहे.

देणगी मोजण्याशी माझा संबंध राहिला नाही : खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी

ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी यांनी रामभक्तांना खुले पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, देणगी मोजण्याच्या प्रक्रियेशी माझा कोणताही संबंध राहिला नाही. मी ट्रस्टच्या कोणत्याही बँक खात्यात अधिकृत स्वाक्षरीकर्ता नाही व सर्व पेमेंट बँक ट्रान्सफरद्वारे होतात. ट्रस्टच्या जमा-खर्चाचे नियमित ऑडिट होते. चोरीचे भयंकर महापाप काही लोकांनी केले. हे अत्यंत वेदनादायक आहे. सखोल चौकशी व्हावी. दोषी कितीही मोठा असला तरी त्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.

विहिंपचे पोलिसांना पत्र; नेत्यांच्या आरोपांचीही चौकशी व्हावी

विहिपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी तपास अधिकाऱ्याला पत्र लिहून म्हटले- काही नेते पुराव्याशिवाय ट्रस्ट व मंदिराची प्रतिमा मलिन करणारी वक्तव्ये करत आहेत. त्यांनी मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल, प्रियंका गांधी, रामगोपाल यादव आणि उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांचा उल्लेख केला आहे.

देणगीचा पैसा पक्षफोडीसाठी वापरला : ठाकरे

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर देणगीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतून राज्यव्यापी ‘रामरक्षा आंदोलन’ सुरू केले. दादरच्या ऐतिहासिक मारुती मंदिराबाहेर मुसळधार पावसात भिजत भगव्या पोशाखातील ठाकरेंनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देणगीचा चोरलेले पैसा पक्षफोडीसाठी वापरला. आम्ही हिंदू भोळे आहोत, पण मूर्ख नाही.

राममार्ग सोडल्यानेच ठाकरेंच्या पक्षाची अधोगती

मला आनंद आहे की शेवटी उद्धवजींना श्रीराम आठवले. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. रामाच्या मार्गाने चालले तर त्यांचं भलं होईल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *