![]()
प्रवासी वाहतुकीचा परवाना घ्यायचा आणि बसमधून चक्क व्यावसायिक माल अन् दुचाकींची छुप्या पद्धतीने वाहतूक करायची, या ‘धंद्या’चा श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पर्दाफाश केला आहे. नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि डोळे
.
प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने ही विशेष मोहीम राबवली. यामध्ये मोटार वाहन निरीक्षक विशाल बटुळे, विशाल मोरे, सहायक मोटार वाहन निरीक्षक राणी सोनवणे व चालक अनिल दुर्गे यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून स्लीपर बसेसची झाडाझडती घेतली. तपासणीदरम्यान अनेक बसेसच्या लगेज कंपार्टमेंटमध्ये प्रवाशांच्या बॅगांऐवजी चक्क दुचाकी वाहने आणि मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक माल भरल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. प्रवासी परवान्याचा असा व्यावसायिक वापर करणे हा मोटार वाहन कायद्याचा थेट भंग आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षमतेपेक्षा जास्त आणि चुकीच्या पद्धतीने माल भरल्यामुळे बसचा गुरुत्वमध्य बदलतो. परिणामी, घाट रस्ता, वळण किंवा उतारावर बस पलटी होण्याचा धोका प्रचंड वाढतो. तसेच, अतिरिक्त वजनामुळे बसची ब्रेकिंग यंत्रणा, टायर आणि सस्पेन्शनवर ताण येऊन भीषण अपघात होऊ शकतो. या कारवाईत अनेक बसेसवर नियमांचे उल्लंघन करून लावलेले अतिप्रखर ‘डॅझलिंग’ दिवे आढळले. समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे डोळे क्षणभर दिपवून टाकणारे हे दिवे केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या पूर्णतः विरोधात आहेत. अनेक अपघातांना कारणीभूत ठरणारे हे दिवेही पथकाने रडारवर घेतले.
स्लीपर बसेसवर झालेली कारवाई कौतुकास्पद असली, तरी शहरातील आणि महामार्गावरील अनेक दुचाकी, चारचाकी आणि अवजड ट्रकलाही समोरच्याचे डोळे आंधळे करणारे ‘एलईडी’ आणि ‘डॅझलिंग’ दिवे बसवले जात आहेत. रात्री या वाहनांमुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे आरटीओने केवळ बसेसपुरते मर्यादित न राहता या दुचाकी व चारचाकी वाहनांवरही अशीच कारवाई करावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड सहन करणार नाही ^प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. बेकायदा मालवाहतूक, नियमबाह्य डॅझलिंग दिवे आणि परवाना अटींचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आरटीओची अशी धडक मोहीम यापुढेही सातत्याने आणि अधिक तीव्रतेने सुरूच राहील.” — अनंत जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर.