![]()
येथील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयातील कथित भ्रष्ट व वादग्रस्त कारभाराला कंटाळून अखेर तीन महिलांनी सोमवारपासून (दि.६) कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शुभांगी प्रवीण ठाकरे, राजकन्या साहेबराव ठाकरे व शोभाबाई भुजंगराव बरडे अशी उपोषणास बसलेल्या महिलांची नावे आहेत. भूमी अभिलेखच्या इतिहासात तीन महिलांनी एकत्र येत आमरण उपोषणाचे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.तालुक्यातील मौजा पिवशी येथील महिलांची शेत सर्वे नंबर गट क्रमांक २ मध्ये ३ हेक्टर २९ आर इतकी कायदेशीर मालकीची शेती आहे. या शेतीची मोजणी करण्यासाठी त्यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी अर्ज केला होता. त्यानुसार २४ नोव्हेंबर रोजी भूमी अभिलेखचे कर्मचारी अमोल मात्रे व वाघाळकर हे मोजणीसाठी आले. मात्र, सदर शेतीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कोर्टाच्या आदेशाशिवाय मोजणी करता येणार नाही, असे सांगत ते निघून गेले व तसाच अहवाल त्यांनी कार्यालयात सादर केला. दुसऱ्याचा ताबा दाखवून बनवला बोगस अहवाल : मोजणीची नोटीस आधीच रजिस्टरमध्ये रद्द करण्यात आली असताना, कर्मचाऱ्यांनी १६ एप्रिल २०२६ रोजी शेतात जाऊन एकतर्फी पंचनामा केला. यामध्ये मूळ मालक शुभांगी ठाकरे यांना गैरहजर दाखवून, त्या जागेवर दुसऱ्याचाच ताबा असल्याचा खोटा अहवाल तयार करण्यात आला. ‘महाभूमी’वर करा तक्रार भूमी अभिलेखच्या कामात दिरंगाई किंवा त्रुटी आढळल्यास, महसूल विभागाच्या ई-तक्रार प्रणालीवर किंवा ‘महाभूमी’ पोर्टलवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन तक्रार करावी. जर भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी चुकीची मोजणी किंवा पक्षपाती अहवाल दिला असेल, तर त्याविरुद्ध ‘उपअधीक्षक भूमी अभिलेख’ यांच्याकडे मोजणी रद्द करण्यासाठी किंवा पुनर्मोजणीसाठी अर्ज करण्याचा कायदेशीर अधिकार नागरिकांना आहे. कार्यालयातील अधिकारी किंवा दलाल कामासाठी पैशांची मागणी करत असतील, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
Source link
भूमी अभिलेखच्या कारभाराविरुद्ध तीन महिलांचे उपोषण:न्यायालयीन प्रकरण सुरू असताना कर्मचाऱ्यांनी परस्पर केली मोजणी