![]()
महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि फसवणुकीचे तब्बल १७ गुन्हे दाखल असलेला भोंदूबाबा अशोक खरात याचे आता थेट ‘शक्तीपीठ महामार्ग’ कनेक्शन समोर आले. नियोजित बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गावरच खरातने सुमारे अडीच काेटींची जमीन खरेदी करून ठेवल्याचे भूसंपादनाच्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. खरातने साेलापूर जिल्ह्यातील कळमण गावात ज्या ठिकाणी जमीन खरेदी केली. त्याच ठिकाणाहून हा महामार्ग जाणार आहे. मार्च २०२४ मधील व्यवहारानुसार कळमणच्या गट क्रमांक २००/१ मधील ४.४८ हेक्टर (सुमारे ११ एकरांपेक्षा जास्त) जमीन खरातच्या नावावर घेतले. खरेदीखतावरील किंमत २ कोटी ४० लाख ९१ हजार २०० रुपये आहे. ईडीची एन्ट्री; अधिकारी आणि नेत्यांचे धाबे दणाणले! अशोक खरातची तब्बल २ हजार कोटींची मालमत्ता आणि त्यात राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांची छुपी गुंतवणूक पाहता आता चौकशीसाठी थेट ‘ईडी’ ची एन्ट्री झाली. ईडीच्या तपासामुळे खरातला माहिती पुरवणारे वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या काळ्या धंद्यात ‘स्लिपिंग पार्टनर’ असलेले अनेक पांढरपेशे रडारवर आले.
Source link
इन्व्हेस्टिगेशन:भोंदू खरातची शक्तिपीठ महामार्गावर सोलापुरात 2.5 कोटींची जमीन खरेदी; कळमण गावात 11 एकरांहून जास्त भूखंड