Headlines

मुख्यमंत्री सहायता निधीला आता 8 तासांत मंजुरी:नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे रुग्णालय ते प्रशासकीय दिरंगाई टळणार, बाह्य हस्तक्षेप संपेल




राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी आता निधीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने विकसित केलेल्या नव्या ऑनलाइन प्रणालीमुळे अवघ्या ८ कार्यालयीन तासांत मदतीचा अर्ज मंजूर होणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांवर अवलंबून न राहता रुग्णालयच पुढाकार घेणार आहे. आतापर्यंत कागदपत्रांची जुळवाजुळव व मंजुरीसाठी हेलपाटे मारण्यात रुग्णांच्या नातेवाइकांचा वेळ जात होता. अनेकदा त्याने उपचारांत अडथळे येत होते. मदतीसाठी येथे संपर्क करा रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. या प्रणालीमुळे पारदर्शकता येईल आणि मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने कामाचा वेग वाढेल, अशी माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. अधिक माहितीसाठी गरजू रुग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. गोल्डन अवरमध्ये जीवनदान या निर्णयामुळे आरोग्य व्यवस्थेतील लालफितीचा कारभार कमी होईल. गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी गोल्डन अवरमध्ये निधी उपलब्ध होणे हे जीवनदान ठरू शकते. आता चेंडू रुग्णालय प्रशासनाच्या कोर्टात असून, त्यांनी किती तत्परतेने अर्ज सादर केले यावरच या योजनेचे यश अवलंबून असेल. ४० हजार रुग्णांना ३३३ कोटींची मदत सदर योजनेत गेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) मदत कक्षाने ४०,७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार रुपयांचे अर्थसहाय्य थेट वितरित केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *