Headlines

श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा:आमदार विलास भुमरे यांची उपस्थिती, 3 दिवस धार्मिक कार्यक्रम‎




पैठण शहरातील यशवंतनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिराच्या लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंगळवारी भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. मंदिराचे लोकार्पण आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विद्या भुषण कावसानकर यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. यानिमित्त आयोजित तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यात विविध वैदिक विधी, शोभायात्रा, हरिकीर्तन, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी बाहेरील नाथ मंदिरापासून यशवंतनगर येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यानंतर वैदिक मंत्रोच्चारात विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. बुधवार (दि. ८) रोजी होम, हवन व इतर वैदिक पूजाविधी पार पडणार आहेत. तर गुरुवारी (दि. ९) रोजी शुभमुहूर्तावर खासदार संदीपान भूमरे यांच्या हस्ते श्री काशी विश्वेश्वर महादेवांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानंतर हरिकीर्तन, महाआरती तसेच दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नगराध्यक्ष भूषण कावसानकर, पंचायत समितीचे सभापती विनोद बोंबले, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, स्वप्निल साळवे, अजित पगारे, विष्णू खंडागळे, मनीष औटे, आदेश सिद्धीवाल यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल धस आणि श्री काशी विश्वेश्वर महादेव महिला समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *