Headlines

75 टक्के पेरण्या; दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांची धाकधूक अद्यापही कायम:रानटी डुकरांमुळे शेतकऱ्यांना तुरीच्या दुबार पेरणीचा फटका‎




जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील सुमारे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्याच्या विविध भागांत अधूनमधून पाऊस झाला असला, तरी आतापर्यंत एकदाही सर्वदूर दमदार सार्वत्रिक पावसाची नोंद झालेली नाही. झालेला पाऊस सध्या पिकांना तग धरण्यासाठी पुरेसा ठरला असला, तरी जमिनीत पाणी मुरून दीर्घकाळ ओलावा टिकावा आणि जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ व्हावी, इतका पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून, शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. यंदा मान्सून जिल्ह्यात तब्बल तीन आठवडे उशिराने दाखल झाला. २४ जून रोजी झालेल्या पहिल्या दमदार पावसानंतर खरीप पेरण्यांना वेग आला. गेल्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांनी सुमारे ७५ टक्के पेरण्या पूर्ण केल्या. पेरणीनंतर तात्पुरता पाऊस अनेक भागांत झाला असला, तरी जमिनीत खोलवर मुरणारा आणि पिकांना दीर्घकाळ संरक्षण देणारा पाऊस अद्याप झालेला नाही. मागील दोन दिवसांसाठी हवामान विभागाने जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. मात्र, या कालावधीतही जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. दोन दिवसांत केवळ सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण अपुरे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. प्रा. हेमंतकुमार डिके, सहाय्यक प्राध्यापक, प्रादेशिक संशोधन केंद्र. आठवडाभर तरी दमदार पावसाची शक्यता नाही ^ ६ व ७ जुलैला पावसाची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, मोसमी प्रणाली मध्य प्रदेशाकडे सरकल्याने पाऊस झाला नाही. ८ जुलैला पावसाची शक्यता असली, तरी प्रणालीही प्रभावी नाही. त्यानंतर सहा दिवसांत पाऊस देणारी प्रभावी वातावरणीय प्रणाली दिसून येत नाही. डॉ. प्रवीण कुमार, हवामानशास्त्रज्ञ. तूर्तास पिकांना धोका नाही; मात्र पावसाची गरज पेरणीनंतर बहुतांश भागांत झालेल्या पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशीच्या बियाण्यांना अंकुर फुटले असून अनेक ठिकाणी रोपेही वर आली आहेत. त्यामुळे सध्या पिकांना धोका नाही. मात्र, जमिनीत मुरणारा सातत्यपूर्ण पाऊस होणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर तलाव, धरणे आणि इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यासाठी दमदार सार्वत्रिक पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या घाबरून न जाता परिस्थितीवर लक्ष ठेवावे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *