Headlines

‘उडान’मध्ये सोलापूर–मुंबई, अमरावती–पुणे हवाई मार्ग:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती




महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सुधारित ‘उडान’ योजनेअंतर्गत सोलापूर–मुंबई आणि अमरावती–पुणे या दोन हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही मार्गांवर दोन्ही दिशांनी विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे सोलापूर आणि अमरावतीसारख्या शहरांना राज्यातील प्रमुख आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांशी थेट जोडण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी पुण्यात दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच मोठ्या शहरांबरोबरच लहान आणि मध्यम शहरांमध्येही हवाई वाहतुकीचे जाळे विस्तारावे, या उद्देशाने ‘उडान’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या सुधारित स्वरूपात राज्यांना प्रादेशिक हवाई मार्ग निश्चित करण्याच्या प्रक्रियेत अधिक सक्रिय सहभागाची संधी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. सोलापूर अमरावतीसाठी आहे महत्त्वाची संधी सोलापूर हे वस्त्रोद्योग, व्यापार, धार्मिक पर्यटन आणि कृषी आधारित उद्योगांसाठी ओळखले जाणारे महत्त्वाचे शहर आहे. सोलापूर ते मुंबई थेट हवाई संपर्क उपलब्ध झाल्यास व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक तसेच विविध कामांसाठी मुंबईला जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होऊ शकतो. त्याचबरोबर सोलापूरच्या औद्योगिक आणि पर्यटनविषयक संधींनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *