Headlines

ग्रामपंचायतींकडून पालखी स्वागताची तयारी:हिरकणी कक्षांची उभारणी सुरू, यात्रा अनुदान मिळाल्याने कामांना वेग; 22 जुलै रोजी दिंड्यांचा तालुक्यात प्रवेश


.

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे प्रस्थान झाले असून, येत्या २२ जुलै रोजी या पालख्यांचे पंढरपूर तालुक्यात आगमन होणार आहे. यंदा शासनाकडून पालखी प्रस्थानापूर्वीच भरघोस यात्रा अनुदान मिळाल्याने, स्वागतासाठी पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

पंढरपूर तालुक्यतील पिराची कुरोली, भांडीशेगाव, वाखरी, गोपाळपूर आणि करकंब यांसारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायती सध्या युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. पिराची कुरोली येथे सर्व संतांच्या पालख्यांचे तालुक्यात स्वागत केले जाते तर वाखरी येथे पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम असतो त्यामुळे या मार्गावरील ग्रामपंचायतींनी नेहमीप्रमाणे पालख्यांच्या स्वागतासाठी तयार सुरू केली आहे.

यंदा पालखी मार्गावरील जर्मन हँगरची संख्या वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे हॅन्गर उभारण्याच्या जागांची स्वच्छता आणि वारकरी सुविधा केंद्रांची उभारणी, करण्यासाठी नियोजन केले जात आहे. यात्रेच्या कामात कोणतीही कसूर राहू नये, ही कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत यासाठी वरिष्ठ पातळीवरून थेट देखरेख सुरू आहे. तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाचे या संपूर्ण नियोजनावर बारकाईने लक्ष आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी सातत्याने बैठका घेऊन या कामांचा आढावा घेतला आहे. यंदा प्रशासनाने पालखी मार्गावरील गावांना निधी वितरित केल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. यामध्ये गावे १३ ते १६ लाख रुपये. विसावा असणारी गावे ७ ते ८ लाख रुपये. आणि मार्गावरील इतर गावे ३ ते ५ लाख रुपये एवढे भरघोस अनुदान देण्यात आले आहे. महिला भाविकांसाठी स्नानगृहे, ‘हिरकणी कक्ष’ आणि चेन्जिंग रूमची (कपडे बदलण्याची जागा) उभारणी केली जात आहे. महावितरण कडून पालखी मार्ग, पालखी मुक्कामाचे तळ, आणि गावात गरजेनुसार विजेचे नवीन डीपी बसवणे, विजेच्या खांबांची व तारांची दुरुस्ती करणे, आदी कामांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते. लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत विविध कामे वेगाने केली जात आहेत. यामध्ये स्वच्छता व पाणीपुरवठा, पालखी तळ आणि रिंगण तळांची दुरुस्ती, स्वच्छता, मुरुमीकरण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्थातालुक्यातील प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा जास्तीचे जर्मन हँगर उभा करण्यात येणार आहेत. तसेच वाखरीच्या इसबावी लगत असलेल्या उपनगरी भागात पौर्णिमेपर्यंत वारकरी राहतात ही गरज ओळखून ग्रामपंचायतीच्या सुमारे २ एकर जागेतील अतिक्रमणे हटवून वारकरी सुविधा केंद्रासाठी जागा तयार केलेली आहे. तसेच पाणी पुरवठा पाईप लाइनची दुरुस्ती सुरू केली आहे. भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन गावच्या हद्दीत असलेले डिजिटल बोर्ड हटवण्यात येत आहेत. संबंधिताना नोटीसा देण्याचे काम सुरू केले आहे. शौचालय आणि स्नानगृहणाची जागा निश्चित करून नव्याने स्नानगृहे उभा करण्यात येत आहेत.वाखरी गावात अतिक्रमणे हटवून वारकरी सुविधा केंद्रासाठी जागा खुली केली. वाखरी गावात अखेरच्या मुक्कामी यंदा सात लाखाहून अधिक वारकरी येतील असा अंदाज आहे.

शौचालयांची दुरुस्ती अन् फिरती शौचालये

अनुदानामुळे कामे वेळेत पूर्ण होणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *