Headlines

ज्ञानोबा-माऊलींच्या जयघोषात शिवेश्वर देवस्थानची पायी दिंडी पंढरीकडे रवाना:यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष, 18 दिवसांचा पायी प्रवास‎



टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ज्ञानोबा-माऊलीच्या जयघोषात शेलगावनजीकच्या वाकी येथील श्रीक्षेत्र शिवेश्वर देवस्थानच्या पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. रिमझिम पावसाच्या साक्षीने भाविकांच्या अभूतपूर्व उत्साहात ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता हा पालखी

.

शिवेश्वर देवस्थानचे उत्तराधिकारी नामदेव महाराज पल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे यंदा रौप्यमहोत्सवी (२५ वे) वर्ष आहे. सकाळी नामदेव महाराजांच्या हस्ते विधीवत पालखी पूजन झाल्यानंतर वाकी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करून दर्शन घेतले. पुढे नेवपूर येथे ग्रामस्थांनी पालखीचे जोरदार स्वागत केले व वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. हा सोहळा १८ दिवसांच्या पायी प्रवासानंतर २५ जुलै रोजी पंढरपूर येथील नारायणदेव धर्मशाळेत पोहोचेल.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, पंचायत समिती सदस्य प्रवीण गोरे, चेअरमन राजू पवार, सरपंच ज्ञानेश्वर पल्हाळ, काकासाहेब जंजाळ, सरपंच पुंडलिक जंजाळ, पंढरीनाथ महाराज जंजाळ, विजयकुमार वाघमारे यांच्यासह परिसरातील वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *