Headlines

सोलापूर ग्रामीण पोलिस संघाने पटकावले प्रथम बक्षीस:पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील 30 संघांचा सहभाग, क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण‎



खेळाडूंनी खिलाडी वृत्ती ठेवून खेळाचा आनंद घ्यावा, आपले खेळातील प्राविण्य दाखवावे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये एकूण सोलापूर जिल्ह्यातील २९ व पुणे शहरातील बॉम्ब स्क्वॉड विभागाच्या एका संघाने, अशा

.

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून पोलिस आणि जनता यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत, तसेच नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासाचे वातावरण होऊन पोलिस -जनता यामधील दरी कमी व्हावी यासाठी ‘कम्युनिटी पॉलिसिंग’च्या संकल्पनेतून मंगळवेढा पोलिस ठाण्यातर्फे जिल्हास्तरीय भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे प्रथमच आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या हस्ते झाले, ते हॉलीबॉलच्या मैदानात पोलिस स्टेशनसमोर बोलत होते.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे, पोलिस निरीक्षक नागेश बनकर उपस्थित होते. पुढे बोलताना पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे म्हणाले की, “पोलिस आणि जनता यामध्ये संवाद असायला हवा आणि तो संवाद चांगला असण्यासाठी खेळ एक चांगले माध्यम आहे. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातूनही पोलिस संघ तसेच ग्रामीण भागातील संघांनी सहभाग घेतला व उत्कृष्ट असे स्पर्धेचे नियोजन केले होते.

स्पर्धेचे आयोजन करण्यामध्ये मंगळवेढा पोलिस ठाण्यास शिवप्रतिष्ठान स्पोर्ट्स, दिल से स्पोर्ट्स, मंगळवेढा यांनी मोलाचे सहकार्य केले. अशा प्रकारच्या स्पर्धा मंगळवेढा पोलीस ठाण्यातर्फे इतिहासात प्रथमच आयोजित केल्याने ग्रामीण भागातील युवक तसेच सामान्य नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. सदर स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी मंगळवेढा पोलिस स्टेशन आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालयाकडील अधिकारी, एपीआय ढेरे, एपीआय लातूरकर, पीएसआय विजय पिसे, पीएसआय नागेश बनकर यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.

स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक विजेते प्रथम: सोलापूर ग्रामीण पोलिस संघ द्वितीय: शिवप्रतिष्ठान स्पोर्ट्स, मंगळवेढा तृतीय: दिल से स्पोर्ट्स, मंगळवेढा चतुर्थ: अक्कलकोट पोलिस उपविभाग पोलीस संघ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *