Headlines

चीफ पोस्टमास्तर जनरल होत येळीच्या सुपुत्राने रचला इतिहास:या पदावर विराजमान होणारे जिल्ह्यातील पहिले अधिकारी, जि. प. शाळा ते आयआयटी असा प्रवास‎



ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरलेली असते, फक्त गरज असते ती जिद्दीची आणि कष्टाची. हेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील येळी गावचे सुपुत्र रामचंद्र किसन जायभाये यांनी. भारतीय डाक सेवेतील (IPoS) १९९९ बॅचचे वरि

.

रामचंद्र जायभाये हे यापूर्वी नवी दिल्ली येथील पोस्टल संचालनालयात जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी देशभरात प्रवर डाक अधीक्षक, निदेशक, पोस्टमास्तर जनरल अशा अनेक पदांवर आपली सेवा बजावली आहे. आजच्या काळात महागड्या शिकवण्या आणि शहरांमधील सुबत्ता असल्याशिवाय मोठ्या पदांवर पोहोचता येत नाही, हा गैरसमज रामचंद्र जायभाये यांनी खोडून काढला आहे. खेड्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकून, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर देशाच्या टपाल विभागाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो तरुणांसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरेल.नागपूर येथे निदेशक म्हणून कार्यरत असताना डाक विभागाने चालू केलेला महत्वाकांक्षी फ्रायटर ऑपरेशन प्रोजेक्ट मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.

या नियुक्तीनंतर मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये म्हणाले, केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना ग्रामीण भागातील आणि तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे हे माझे मुख्य ध्येय असेल. बँकिंग, डाक जीवन विमा, मेल, पार्सल आणि नागरिक केंद्रित सेवा अधिक गतिमान करून सर्वसामान्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आमचे डाक सर्कल कटिबद्ध राहील.शेतात काबाडकष्ट करून घर सांभाळून शिक्षणासाठी प्रेरित करणारी आई हि त्यांच्या जीवनातील रोल मॉडेल आहे.कुटुंबीय आणि सुविद्य पत्नी शारदा यांची या जीवनप्रवासात खंबीर साथ लाभलेली आहे.दहावी पास झाल्यानंतर केलेली ध्येयनिश्चिती आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी केलेला फोकस आणि एकाग्रता हि माझ्या यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे असे ते सांगतात. ग्रामीण भागातून असलेल्या रामचंद्र जायभाये यांचा भारतीय डाक सेवेतील पोस्टमास्तर जनरल पदापर्यंतचा प्रवास नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

जिल्हा परिषद ते आयआयटीपर्यंतचा संघर्षमय प्रवास रामचंद्र जायभाये यांचा हा प्रवास कोणत्याही चित्रपटाला शोभेल असाच प्रेरणादायी आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण येळी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करत त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून कृषी अभियांत्रिकीमध्ये बी.टेक. पदवी मिळवली. त्यानंतर देशातील सर्वोच्च शिक्षण संस्था असलेल्या आयआयटी खरगपूरमधून १९९८ मध्ये एम.टेक. पूर्ण केले. पुढच्याच वर्षी, म्हणजेच १९९९ मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत देशात ३५२ वा क्रमांक मिळवून भारतीय डाक सेवेत (IPoS) झेप घेतली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *