Headlines

पर्यटकांत भीती:वेरूळ लेणीत नाग निघाला; कर्मचाऱ्यांमुळे अनर्थ टळला, लेणी क्रमांक 16 च्या परिसरातील घटना‎




वेरूळ लेणी परिसरातील गवतात शुक्रवारी साप निघाल्याची घटना घडली असताना, शनिवारी पुन्हा दुपारी साडेचारच्या सुमारास लेणी क्रमांक १६ (कैलास लेणी) च्या परिसरात पर्यटकांना एक मोठा नाग आढळून आला. नाग पाहताच पर्यटकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. यावेळी तैनात असलेले सुरक्षा रक्षक असलम शेख, सुपरवायझर साहू यांनी तातडीने धाव घेत सतर्कता दाखवली. त्यांनी सर्पमित्राला पाचारण केले. सर्पमित्राने या नागाला लेणी परिसराबाहेर सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सुरक्षा रक्षकांच्या सूचकतेमुळे अनर्थ टळला. घटनेनंतर वेरूळ लेणी प्रशासनाने पर्यटकांना मुख्य रस्त्यावरून चालण्याचे, पावसाळ्यात गवताळ किंवा झुडपांच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. कोणताही वन्यजीव आढळल्यास धोका न पत्करता त्वरित सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *