Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:गंज बाजारात नवे भाजी मार्केट, व्यापारी संकुल; अतिक्रमणांची समस्या सुटणार




शहराच्या मुख्य बाजारपेठेतील गंज बाजार येथे असलेले जुने आणि मोडकळीस आलेले भाजी मार्केट पाडून त्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त नवीन भाजी मार्केट व बहुमजली व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव महासभेकडे सादर करण्यात आला आहे. ११.७० कोटी रुपये खर्चून सुमारे साडेबारा हजार चौरस फुटांच्या जागेत हे भव्य संकुल उभे राहणार आहे. केंद्राच्या अर्बन चॅलेंज फंडमधून २५ टक्के रकमेचे कर्ज घेण्याचाही प्रस्ताव असून मार्केट महापालिका स्वतः उभारणार की बीओटी तत्त्वावर करायचे याबाबत महासभेत निर्णय घेतला जाणार आहे. नव्या मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी ४२ ओटे तसेच, भाजी व फळ विक्रेते, इतर व्यावसायिकांसाठी ७२ व्यापारी गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासोबतच ग्राहकांच्या सोयीसाठी तळघरामध्ये किमान १३८ दुचाकी पार्किंगची व्यवस्था असेल. तसेच, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधाही या नव्या संकुलात असणार आहे. या निर्णयामुळे बाजारपेठेतील अतिक्रमणे, पार्किंगची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच, गंज बाजारातील स्वच्छतेचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. अशी असेल नव्या संकुलाची रचना • बेसमेंटमध्ये म्हणजेच तळघरात १३८ दुचाकी पार्किंग • तळमजल्यावर २० दुकाने आणि भाजी विक्रेत्यांसाठी ४२ ओटे • पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी ३६ गाळे • तळमजल्यावर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह जुन्या गाळेधारकांबाबत महासभेत होणार निर्णय जुन्या मार्केटमध्ये रेकॉर्डवर ४२ दुकाने व १०० ओटेधारक असून त्यापैकी किती प्रत्यक्ष वापरात आहेत याची माहिती मार्केट विभागाकडे उपलब्ध नाही, त्यामुळे या जुन्या भाडेकरूंचे नव्या संकुलात पुनर्वसन कसे करायचे हा तिढा महासभेला सोडवावा लागेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *