Headlines

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा:छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 5 दिवस पावसाची शक्यता, कसे राहील हवामान?




जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्याला चांगलेच झोडपून काढले आणि धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने राज्यात उकाडा कमालीचा वाढला आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असतानाच, भारतीय हवामान विभागाने एक मोठा आणि दिलासादायक इशारा दिला आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचे पुनरागमन होणार आहे. कसे राहील राज्याचे हवामान? सध्या राज्यात अनेक ठिकाणी वातावरण कोरडे असून दुपारच्या वेळी उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. आजदेखील राज्यात अनेक भागात हलक्या पावसाची शक्यता असली, तरी वातावरण बहुतांश कोरडेच राहील. मात्र, मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या हिस्सार, मेरठ, गोरखपूर ते थेट आसामपर्यंत सक्रिय आहे. तसेच, ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीमुळे आगामी ४ ते ५ दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगरकरांसाठी मोठा दिलासा ५ दिवस पावसाची शक्यता राज्यातील इतर भागांप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाची दडी आणि वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. मागील २४ तासांत शहरातील कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. मात्र, इथल्या नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा आता संपणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचा आगामी पाच दिवसांचा अंदाज खालीलप्रमाणे असेल: या काळात तापमानातही किंचित घट होऊन ते ३२ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. यामुळे उकाड्यापासून मोठा दिलासा मिळेल आणि पिकांनाही आवश्यक ओलावा मिळेल. हवामान विभागाने या पाच दिवसांसाठी कोणताही अधिकृत धोक्याचा इशारा दिलेला नसला, तरी नागरिकांनी पावसाच्या आगमनासाठी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार दरम्यान, वायव्य मध्य प्रदेश आणि नैऋत्य उत्तर प्रदेशाच्या भागात निर्माण झालेल्या अतिशय तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील इतर राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, ही हवामान प्रणाली सुरुवातीला उत्तर-वायव्य दिशेने सरकेल आणि त्यानंतर अचानक ईशान्य दिशेकडे वळेल. यामुळे उत्तराखंडच्या डोंगराळ भागात ढगांची मोठी दाटी झाली असून, मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आजपासून (१३ जुलै) पुढील काही दिवस तिथे अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा कडक सल्ला प्रशासनाने दिला आहे. हेही वाचा.. उत्तराखंडमध्ये भूस्खलन, 2 हायवेसह 126 रस्ते बंद:दिल्लीत यमुनेत 4 मुले वाहून गेली, यूपी-बिहारसह 18 राज्यांना पावसाचा रेड अलर्ट देशाच्या बहुतांश भागांत मान्सूनचा वेग मंदावला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, सध्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांपुरताच पावसाचा जोर मर्यादित आहे. तरीही, आज बिहार आणि पश्चिम बंगालसह १८ राज्यांसाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन राष्ट्रीय महामार्गांसह एकूण १२६ रस्ते अद्याप बंद आहेत. स्यानचट्टीजवळील ऋषिकेश-यमुनोत्री महामार्ग रविवारी सलग तिसऱ्या दिवशीही बंद राहिला. तसेच, ढिगाऱ्यामुळे तवाघाट-गुंजी महामार्गही बंद झाला आहे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *