राम मंदिरासाठी कारसेवा केलेल्या देवाभाऊंना शहाणपण शिकवण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. देवाभाऊंना रामरक्षा पाठ आहे तुमच्यासारखे पुस्तकात पाहून देखील रामरक्षा म्हणता येत नाही अशी त्यांची अवस्था नाही, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन उबाठाला लगावला आहे
.
नवनाथ बन म्हणाले की, नवनीत राणा यांनी रामरक्षा म्हणण्यासाठी परवानगी घेतली नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात तुम्ही राणांना 8 दिवस जेलमध्ये डांबले होते. तेव्हा तुम्ही धर्माचे ठेकेदार होतात का? आज तुमचे हे आंदोलन नाही तर नौटंकी सुरू आहे. तुम्हाला साधी रामरक्षा म्हणता येत नाही, तुम्ही नमाज, अजान पठण स्पर्धाच घेतली पाहिजे.
पुढचा विक्रमही देवाभाऊंच्याच नावावर
नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आणखी एक विक्रम झाला. यापूर्वी सलग 5 वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस यांचे नाव कोरले गेले आहे. 14 कोटी जनतेच्या आशीर्वादाने भाजपचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत, शरद पवार यांना मागे टाकत देवेंद्र फडणवीस यांनी हा नवा विक्रम केला आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर होणार.

ठाकरेंचा दाढ्या कुरवाळण्याचा विक्रम
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांचा राष्ट्रद्रोहाचा आणि उद्धव ठाकरेंचा दाढ्या कुरवाळण्याचा विक्रम या जगामध्ये कोणीही मोडू शकणार नाही. राष्ट्रद्रोह करणे पाकिस्तानच्या बाजूने बोलणे, तशी भूमिका घेणं हा राऊतांच्या नावावरचा विक्रम आहे. तर मतांसाठी वडीलांच्या विचारांशी गद्दारी करणे आणि अफजल खान, औरंगजेबाच्या दाढ्या कुरवाळण्याचा विक्रम उद्धव ठाकरेंच्या नावावर आहे. बाबर, औरंगजेबाला हा विक्रम मोडता आला नाही. राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना काय करावे ते शिकवू नये. देवाभाऊंच्या नावावर अनेक विकासकामे आहेत.
लाडक्या बहीणींना 2100 रुपये देणार
नवनाथ बन म्हणाले की, लाडकी बहीण योजना सुरू केली तर संजय राऊत यांना का त्रास होत आहे. राऊतांनी लाडक्या बहीणींचे शाप घेण्याचे पाप करू नये. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांना महिला राजकारणातून हद्दपार करतील. पत्राचाळीत तुम्ही जो घोटाळा केला ते पैसे तुमची संपत्ती विकून वसूल केले पाहिजे. लाडक्या बहीणींच्या योजनेला विरोध करण्याचे काम उबाठाचे संपत राऊत यांनी केला आहे. लाडक्या बहीणी महायुतीच्या पाठिशी आहे. ही योजना बंद व्हावी म्हणून काँग्रेस आणि उबाठा प्रयत्न करत आहे. पण ही योजना महायुती सरकार बंद होऊ देणार नाही. राजाराम राऊत आले तरीही ही योजना बंद होणार नाही. 2100 रुपये महिना लाडक्या बहिनींना देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत.
संबंधित वृत्त वाचा
सरकारला सोनम वांगचूक यांचा बळी हवाय का?:संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात, ‘लाडकी बहीण’ आणि शरद पवारांबाबतही मोठे भाष्य

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (सोमवारी) दुपारी १२.३० वाजता मातोश्रीवर एका ‘राष्ट्रीय विषयावर’ विशेष पत्रकार परिषद घेणार असून, यातून ते कुणाला धक्का देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यासोबतच, नागपूरमध्ये पक्षाकडून रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठणाचे आंदोलन करण्यात येणार असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे खुले निमंत्रण संजय राऊत यांनी दिले आहे. वाचा सविस्तर