![]()
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड– सातारा मार्गावरील शेंद्रे उड्डाणपुलावर रविवारी सीएनजी वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस गळती झाल्याची घटना घडली. माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिस निरीक्षक तांबे यांना कळविण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार पोलिस पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. तसेच महामार्ग सुरक्षा पथक आणि राष्ट्रीय महामार्ग मदत क्रमांक १०३३ वरही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता संबंधित वाहन हे CNG गॅस टँकर असल्याचे स्पष्ट झाले. टँकरमधील CNG गॅस किटच्या पाइपला गळती झाल्याने सुमारे ६०० किलो CNG गॅस हवेत पसरण्याची घटना घडली. संबंधित टँकरचा चालकाने वाहन दुरुस्तीसाठी सर्व्हिस स्टेशनकडे नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तात्काळ खबरदारीची पावले उचलत महामार्गावरील वाहतूक काही काळ पर्यायी मार्गाने सुरळीत सुरू ठेवली. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. परिस्थितीवर पोलिस आणि महामार्ग यंत्रणेकडून सतत लक्ष ठेवण्यात आले असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. हे ही वाचा… सातारा DPDC बैठकीत विकासापेक्षा महायुतीच्या केमिस्ट्रीचीच चर्चा:उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंची मिश्कील जुगलबंदी, गोरे-मोहिते वादाचेही पडसाद सातारा जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) सोमवारी झालेल्या बैठकीत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ७०२ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी मिळाली. मात्र विकासकामांच्या आढाव्यापेक्षा महायुतीतील नेत्यांचे एकाच व्यासपीठावर झालेले शक्तिप्रदर्शन, निधी वाटपावरील चर्चा आणि परस्परांतील हलक्याफुलक्या टोलेबाजीनेच बैठकीची अधिक चर्चा रंगली. सविस्तर वाचा…
Source link
पुणे-बंगळुरू महामार्गावरील शेंद्रे उड्डाणपुलावर सीएनजी गळती:600 किलो गॅस हवेत पसरला, पोलिसांकडून तातडीने उपाययोजना