Headlines

पिसाळलेल्या कुत्र्याचा उंडणगावात धुमाकूळ:चौघांसह रेड्याला चावा, रेबीज लस उपलब्ध नसल्याने जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवले‎



येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी अक्षरशः धुमाकूळ घालत पाच नागरिकांसह एका म्हशीच्या रेड्यावर हल्ला केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत कमलबाई पाटील, बाळू नरवडे, नीलेश जैस्वाल, एकनाथ गव्हाणे हे जखमी झाले असून भगवतीवाडी येथील एका म्ह

.

जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडणगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र, कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारे अत्यावश्यक रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन (Anti-Rabies Vaccine) प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार न करता सर्व जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे पाठवले. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याचा वाढता धोका लक्षात घेऊन संतप्त नागरिकांनी एकत्र येत त्या कुत्र्याला ठार केले.

दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *