Headlines

हिरवाई अन् स्वच्छतेमुळे शेळकेवाडीच्या डिजिटल शाळेस ‘फाइव्ह स्टार’:केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ”स्वच्छ व हरित विद्यालय रँकिंग” स्पर्धेत यश



पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा… चिमुकले संगणकावर गिरवताहेत धडे… इंटरॅक्टिव्ह बोर्डवर सोडवतात गणितं… शाळेचा परिसरात एक पेड माँ के नामअंतर्गत वृक्षारोपण केल्याने जणून वनराईच साकारली… शाळेच्या परसबागेत पिकवलेल्या पालेभाज्यांचाच विद्यार्थ्यांना पोषण

.

सांगोला तालुक्यातील शेळकेवाडी (शिवणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘स्वच्छ व हरित विद्यालय रँकिंग’ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत ९०.८० गुणांसह फाइव्ह स्टार मानांकन प्राप्त केले आहे. देशातील सर्वोत्तम १९१ शाळांमध्ये या शाळेने ६३ वा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला हा मान मिळाला आहे. या यशामागे मुख्याध्यापक भागवत भाटेकर, सहशिक्षिका शीतल पोळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास वाघमोडे, उपाध्यक्ष समाधान भाटेकर, सरपंच दादासाहेब घाडगे, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रयत्न आहेत.

२०२३ मध्ये अवघा य़८ असलेला विद्यार्थीपट २०२४ मध्ये ४६ व २०२५ मध्ये ५६ वर गेला असून, सध्या शाळेचा विद्यार्थीपट ७० वर पोहोचला आहे. सांगोल्याच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनीही आपली मुले या शाळेत घातली होती.

”मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानात तालुक्यात प्रथम आणि पुणे विभागात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या या शाळेने आता राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप उमटवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचा लवकरच नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. लोकसहभागातून निधी उभारून शाळेचा विकास साधला आहे. आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकवर्गणी व पुरस्काराची रक्कम जमा झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *