Headlines

दर्जेदार शिक्षणाची संधी:केंद्रीय विद्यालयात 200 जागा; उद्यापासून ऑफलाइन प्रक्रिया




नव्याने सुरू होणाऱ्या केंद्रीय विद्यालयात येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेश प्रक्रियेला १५ जुलै २०२६ पासून सुरुवात होत आहे. एकूण २०० जागा असून, विशेष म्हणजे ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. पालकांना अर्ज जुने शहरातील हरिहपेठमधील जि.प. टाऊन हायस्कूल कार्यालयातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वाढती शैक्षणिक गुणवत्ता, राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम आणि केंद्र सरकारच्या शिक्षण व्यवस्थेमुळे अनेक पालक केंद्रीय विद्यालयाकडे आकर्षित होत असल्याने या प्रवेश प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्रीय विद्यालयासाठी गुडधी येथे जागा मंजूर करण्यात आली असून, तिथे कायमस्वरूपी इमारत निर्माण होणार आहे. तोपर्यंत िज.प. टाऊन हायस्कूल येथे प्रक्रिया होणार आहे. शाळा पहिल्या टप्प्यात इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांसह (प्रत्येक इयत्तेची एक तुकडी) सुरू केली जात आहे. प्रत्येक वर्गाची प्रवेश क्षमता ४० आहे. नोंदणी फॉर्म मिळणे आणि सादर करणे यासाठी १५ जुलै ते २८ जुलै अशी मुदत असून (फक्त कामकाजाच्या दिवशी) फॉर्म स्वीकारण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२:३० आणि दुपारी १:०० ते २:३० वाजेपर्यंत अशी आहे. प्रवेशाचे ठिकाण केंद्रीय विद्यालय अकोला, जिल्हा परिषद हायस्कूल (शहर), हरिहर पेठ, हे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य बालाजी मारकवार यांनी केले आहे. ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय विद्यालयात संघटनच्या (केव्हीएस) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार लॉटरी काढली जाईल आणि त्याच दिवशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. {प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय ३१ मार्च २०२६ रोजी पहिली साठी ६ वर्षे पूर्ण, पण ८ वर्षांपेक्षा कमी. दुसरीसाठी ७ वर्षे पूर्ण, पण ९ वर्षांपेक्षा कमी. तिसरीसाठी ८ वर्षे पूर्ण, पण १० वर्षांपेक्षा कमी. इयत्ता चौथीकरिता ९ वर्षे पूर्ण, पण ११ वर्षांपेक्षा कमी. इयत्ता पाचवीसाठी १० वर्षे पूर्ण, पण १२ वर्षांपेक्षा कमी असावे. {प्रवेश प्रक्रियाऑफलाइन आहे.अर्ज कार्यालयात मोफत आहेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अंतिम मुदतीपूर्वी जमा करणे बंधनकारक आहे. वयोमर्यादा असल्याने कागदपत्र पूर्तता गरजेची प्रवेशासाठी वयोमर्यादा महत्त्वाची असते. मुलाचे जन्मप्रमाणपत्र आणि वयाची अट यांची जुळवणी आधीच करून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार ठेवणे आणि प्रत्येक वर्षी केव्हीएसच्या प्रवेश नियमांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. केंद्रीय विद्यालयातील शिक्षण हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत, दर्जेदार आणि देशभरात एकसमान अभ्यासक्रमावर आधारित असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. असे आहे वेळापत्रक . १५ ते २८ जुलै २०२६ : अर्ज वितरण व स्वीकारणे .३ ऑगस्ट, सकाळी १०.३० : लॉटरी प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात होईल. . ३ ऑगस्ट : निवड यादी जाहीर नोटीस बोर्डावर प्रकाशित होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *