![]()
अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या आस्थापनेवरील ३२ कर्मचाऱ्यांना अखेर पदोन्नती मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ही प्रक्रिया जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नव्याने सुरू केली होती, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या जिल्हास्तरीय पदोन्नती समितीची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रस्ताव सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीस मान्यता देण्यात आली. या पदोन्नती प्रक्रियेत लिपिक आणि टंकलेखक यांना वरिष्ठ लिपिक पदावर नियुक्त करण्यात आले आहे, तर शिपाई आणि सफाई कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक पदांवर पदोन्नती मिळाली आहे. नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त तथा नगरपालिका प्रशासक डॉ. विकास खंडारे यांच्या संकल्पनेतून हा विषय पुढे आला होता, ज्याला जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी पाठिंबा दिला. पदोन्नतीनंतर काही कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी, सहायक आयुक्त आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पदोन्नत कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. मनुष्यबळ वाढल्यामुळे येत्या काळात नगरपालिका स्तरावरून अधिक लोकाभिमुख आणि गतिमान काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या पदोन्नती प्रक्रियेत जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अचलपूर नगरपरिषदेतील १२, वरुडमधील ५, अंजनगाव सुर्जी आणि दर्यापूरमधील प्रत्येकी ३, मोर्शी आणि चांदूरबाजारमधील प्रत्येकी २, तर शेंदुरजनाघाट आणि धामणगाव रेल्वे येथील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळाली आहे.
Source link
20 वर्षांनी अमरावती नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती:32 शिपाई, लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि अधीक्षकपदी नियुक्त