![]()
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला (YCMOU) प्रथमच ऑनलाईन पद्धतीने ‘एमबीए’ आणि ‘बीसीए’ या दोन पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि दूरस्थ शिक्षण मंडळाने (DEB) अधिकृत मान्यता दिली आहे. अमरावती येथील विभागीय कार्यालयाने या मा
.
विद्यापीठाच्या ३६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन शिक्षणाचे एक नवे आणि ऐतिहासिक पर्व सुरू होत आहे. मुक्त विद्यापीठात गेल्या चार दशकांपासून दूरस्थ शिक्षण दिले जाते, ज्यातून अनेक विद्यार्थी लाभान्वित झाले आहेत. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य असून, आता ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यापीठाचा आवाका आणखी वाढणार आहे.
या नव्या मान्यतेमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश-विदेशातील विद्यार्थ्यांसाठीही उच्च शिक्षणाचे दार खुले झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि शिक्षणाची दुसरी संधी शोधणाऱ्यांसाठी हे अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरतील.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे विभागीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाचा एमबीए अभ्यासक्रम विद्यार्थी, नोकरदार आणि उद्योजकांसाठी फायदेशीर ठरेल. तर, बीसीए अभ्यासक्रम व्यवसाय, बँकिंग, सॉफ्टवेअर विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनालिटिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्य घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्कृष्ट संधी आहे.
विद्यापीठ प्राधिकारिणीचे सदस्य तथा विदर्भाच्या अनुशेषाचे अभ्यासक डॉ. संजय खडक्कार यांनी या मान्यतेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “विद्यापीठाच्या स्थापनेनंतर १९८९ पासूनच्या ३६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन पदवी शिक्षण सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे. ही केवळ नाव नोंदणी शिक्षणाची सुविधा नसून, विद्यापीठाच्या डिजिटल परिवर्तनातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. यातून महाराष्ट्रासह देशभरातील आणि जगभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, लवचिक व तंत्रज्ञानाधारित शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. ही मान्यता खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरणार असून, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यापीठाला नव्या उंचीवर नेणारी ठरेल.”
यूजीसी आणि डीईबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे दोन्ही अभ्यासक्रम राबवले जातील. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम (LMS), दर्जेदार ई-कंटेंट, रेकॉर्डेड व्हिडीओ व्याख्याने, ऑनलाईन असाईनमेंट्स, चॅट-संवाद सत्रे आणि ऑनलाईन मूल्यमापन अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा व लवचिक शिक्षणाचा अनुभव मिळेल.