Headlines

पाणीटंचाईच्या झळा तीव्र:जुलै अर्धा संपला तरी 28 टँकर सुरू‎, गंगापूर, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर तालुके टँकरमुक्त‎




जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने पाण्यासाठी अजूनही २८ टँकरद्वारे पुरवठा केला जात असून ३० खासगी विहिरी अधिग्रहित ठेवल्या आहेत. दिलासादायक म्हणजे गंगापूर, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, सोयगाव आणि वैजापूर हे सहा तालुके टँकरमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या २८ टँकरपैकी २० टँकर फुलंब्री तालुक्यात कार्यरत असून, अधिग्रहित ३० विहिरींपैकी २२ विहिरीही याच तालुक्यात आहेत. उर्वरित टँकर आणि विहिरी संभाजीनगर शहर व कन्नड तालुक्यात आहेत. जून महिन्यात जिल्ह्यातील सर्वच ९ तालुक्यांमध्ये २६२ टँकर सुरू होते. त्यामध्ये वैजापूर ४८, गंगापूर ४५, कन्नड ३८, सिल्लोड ३२, पैठण २९, फुलंब्री २६, संभाजीनगर २२, खुलताबाद १५, सोयगाव ७ टँकर कार्यरत होते. मात्र जुलैत ही संख्या २८ वर असून फुलंब्री २०, संभाजीनगर ५ आणि कन्नड ३ या तीन तालुक्यांत टँकर सुरू आहेत. जुलैच्या अहवालानुसार, जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी ३० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २२ विहिरी फुलंब्री, ५ छत्रपती संभाजीनगर आणि ३ कन्नड तालुक्यात आहेत. उर्वरित सहा तालुक्यांमध्ये एकही विहीर अधिग्रहित करण्याची गरज भासलेली नाही. Ã सहा तालुके टँकरमुक्त झाले आहेत. ज्या भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तेथे परिस्थितीनुसार उपाययोजना आहेत. पावसाची स्थिती आणि जलस्रोतांचा आढावा घेतला जात असून गरजेनुसार निर्णय घेतले जातील. – बाळासाहेब शेळके, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर जून महिन्यात ९ तालुक्यांमध्ये एकूण २६२ टँकर सुरू होते. त्यामध्ये वैजापूर ४८, गंगापूर ४५, कन्नड ३८, सिल्लोड ३२, पैठण २९, फुलंब्री २६, संभाजीनगर २२, खुलताबाद १५ आणि सोयगाव ७ टँकर कार्यरत होते. जुलैच्या अहवालात ही संख्या २८ वर आली असून फुलंब्री २०, संभाजीनगर ५ आणि कन्नड ३ या तालुक्यांत टँकर सुरू आहेत. सहा तालुके टँकरमुक्त झाले असले, तरी जुलै महिन्यातच पावसाने उघडीप दिल्याने काही गावांतील पाणीस्थिती पुन्हा चिंतेची बनली आहे. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर पुन्हा टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव येऊ लागल्याची माहिती आहे. त्यामुळे टँकरमुक्तीचा दिलासा किती काळ टिकतो, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाचा खंड पडताच पुन्हा टँकरचे पाणी पुरवठा विभागाकडे प्रस्ताव गरजेनुसार पुढील निर्णय घेणार जून २६२ तर आता जुलैत २८ टँकर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *