Headlines

एनसीसी प्रशिक्षण शिबिरात लोकनेते पाटील विद्यालयाची यशस्वी कामगिरी:चित्रकला, गायन व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये प्रथम; विजेतेपदाची पटकावली ट्रॉफी‎




लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, लासलगाव येथील एनसीसी कॅडेट्सनी नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर ६ ते १५ जुलैदरम्यान आयोजित वार्षिक एनसीसी प्रशिक्षण शिबिरात विविध स्पर्धांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. शिबिरात ड्रिल, साहसिक उपक्रम, फायरिंग, रस्सीखेच तसेच सांस्कृतिक आणि कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या कॅडेट्सनी उल्लेखनीय कामगिरी केली. चित्रकला स्पर्धेत प्रीती वाघ हीने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच गायन स्पर्धेत प्रीती वाघ आणि विराज बोरसे यांनी स्वतंत्र गटात प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश मिळविले. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल विद्यालयाला विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्ड व सिल्व्हर मेडल देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारांचे वितरण ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. एस. किरुएला यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेसाठी हेमंत नाईक यांनी मार्गदर्शन केले. एनसीसी ऑफिसर प्रमोद पवार, क्रीडा शिक्षक चंद्रकांत नेटारे आणि संदीप गंभीरे यांनीही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. शिबिरात कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. एस. किरुएला, सुभेदार मेजर, ट्रेनिंग ऑफिसर सुभेदार गावडे, धात्रक, धर्माधिकारी तसेच बटालियनचे अधिकारी, पी.आय. स्टाफ आणि गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर मेघा यांनी मार्गदर्शन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *