Headlines

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद:मोतीबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात 100 जणांनी केले रक्तदान




भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोतीबाग कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेतर्फे आयोजित या शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे या शिबिराचे चौथे वर्ष होते. शिबिराचे उद्घाटन शाश्वत अकॅडमीचे संचालक महेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा दिली आहे. त्यांचे कार्य आणि समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यांनी दिलेली शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. याप्रसंगी युनिक एअर एक्स्प्रेस इंटरनॅशनल कुरिअर व रिअल इस्टेटमधील व्यावसायिक योगेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. रमेश कांबळे, डॉ. पल्लवी गायकवाड, डॉ. अतुल कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी संतोष अनगोलकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह सचिन भोसले यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय संस्थेचे कार्यवाह प्रसाद खेडकर यांनी करून दिला. संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी महेश पाटील यांचा, तर बाजीराव मणेरे यांनी योगेश शिंदे यांचा भारतमातेची प्रतिमा आणि डॉ. हेडगेवार यांचे जीवन चरित्र पुस्तक देऊन सत्कार केला. अध्यक्ष राजीव जोशी यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले की, रक्ताला पर्याय नसून ते कृत्रिमरीत्या तयार होऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करणे आवश्यक आहे. अशा शिबिरांमुळे सामाजिक जाणिवेची अनुभूती येते. या शिबिरात एकूण शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले. जनकल्याण रक्तपेढीने शिबिरास सहकार्य केले. सर्व रक्तदात्यांना संस्थेतर्फे व जनकल्याण रक्तपेढीतर्फे प्रमाणपत्र, पंच परिवर्तन पुस्तिका आणि भारतमातेची प्रतिमा देण्यात आली. याशिवाय, MPSC स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मयूर यादव (उपशिक्षणाधिकारी), अमित लोकरे (उपजिल्हाधिकारी), योगेश घुले (कक्ष अधिकारी), वैभव ढेरंगे (STI) आणि सचिन तनपुरे (PSI) यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे किरण गांधी, उदय पंचपोर, राजेंद्र वालेकर, बाजीराव मणेरे, प्रकाश आठवले, प्रा. सागर दरेकर तसेच जनकल्याण रक्तपेढीचे संतोष नखाते, अभिषेक हंबर्डे, पूजा माने, पायल गोरे, वैष्णवी चव्हाण, वृषाली शिवलकर, प्राची देशपांडे, दर्शना भुरुक, कल्याणी कोंडे, कीर्ती कुंभार, किशोर पट्टेवाड, किरण जांभळे, संदीप कानगुटकर, विश्वनाथ गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *