![]()
श्रावण महिन्यात होणाऱ्या कावड महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत गांधीग्राम घाटावरील रखडलेल्या कामांवरून जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महिनाभरापूर्वी गांधीग्राम घाटाची प्रत्यक्ष पाहणी करून दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचे समोर येताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. १५ दिवसांत कामे पूर्ण करा. अन्यथा माझ्या यंत्रणेमार्फत कामे पूर्ण करून त्याचे बिल नॅशनल हायवेकडून वसूल करण्यात येईल, असा सज्जड दम जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अधिकाऱ्यांना दिला. बैठकीच्या सुरुवातीलाच गांधीग्राम घाटावरील कामांचा आढावा घेतला. महिनाभरापूर्वी घाटावर भेट देऊन पायऱ्यांची दुरुस्ती, स्लोप, घाट परिसरातील प्रकाशयोजना व रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यातील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नॅशनल हायवेकडून खोदकाम पूर्ण झाले नसल्याने घाटावरील स्लोप व पायऱ्यांचे काम सुरू करता उर्वरित पान ४ पालखी मार्गावर १५ वैद्यकीय पथके करणार तैनात कावड मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी अकोट फैल ते राजेश्वर मंदिर या मार्गावर मोबाइल टॉयलेट उभारावेत, अशी मागणी केली. तसेच अकोला ते गांधीग्राम आणि गांधीग्राम ते अकोट या संपूर्ण मार्गावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. यावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून एकूण १५ वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीत भांडपुरा, भीमनगर चौक, मोठी उमरी, अकोट फैल आणि इतर भागांमध्ये उघड्यावर होणारी मांसविक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली.
Source link
कावड उत्सव; पालखी मार्गावर ‘वॉर रूम’:सीसीटीव्हीद्वारे नजर, गांधीग्राम घाटाचे काम 15 दिवसांत पूर्ण करा- जिल्हाधिकारी