![]()
.
“बाबा, तुम्ही दारू विकू नका… शाळेत मला सगळे ‘दारूवाल्याची मुलगी’ म्हणून हिणवतात…” एका १५ वर्षांच्या निरागस मुलीने डोळ्यात अश्रू आणून आपल्या बापाला घातलेली ही साद… आणि या भावनिक आग्रहाने एका कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गावाचे चित्र बदलून गेले. तालुक्यातील लिंगदेव गावात समाजपरिवर्तनाची एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना घडली. गावात अवैध दारू विकणारे पिनू ऊर्फ शंकर आढाव यांनी आपल्या लेकीच्या आक्रोशानंतर अंतर्मुख होत दारूविक्रीचा काळा व्यवसाय कायमचा बंद केला. एवढेच नव्हे तर, आज त्यांनी स्वाभिमानाने ‘मासे विक्री’चा नवा अधिकृत व्यवसाय सुरू करत समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे.
लिंगदेव गावात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारूविक्री विरोधात महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तीन दिवसांपूर्वी गावात विशेष ग्रामसभा झाली, ज्यात महिलांनी दारूमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या संसारांची व्यथा मांडली. या सामाजिक आंदोलनाचा परिणाम शंकर आढाव यांच्या शाळकरी मुलीवरही झाला. शाळेत जात असताना तिला काही जणांनी दारू विकणाऱ्याची मुलगी म्हणून हिणवले. हा अपमान त्या चिमुकल्या मनाला सहन झाला नाही. तिने रडत रडत घर गाठले आणि थेट वडिलांनाच दारूविक्री बंद करण्याची आर्त विनंती केली. आपल्या व्यवसायामुळे आपल्या निष्पाप लेकीला मान खाली घालावी लागत आहे, हा विचार शंकर आढाव यांच्या काळजाला स्पर्श करून गेला आणि त्यांनी त्याच क्षणी बेकायदेशीर दारूविक्रीला कायमचा रामराम ठोकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
शंकर आढाव यांनी केवळ दारूविक्री बंदच केली नाही, तर सन्मानाने जगण्यासाठी तातडीने मासे विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे, ज्या महिला गावात दारूबंदीसाठी लढा देत होत्या, त्याच आंदोलक महिलांच्या हस्ते या नव्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार डॉ. किरण लहामटे उर्वरित पान ४