![]()
फर्स्ट पर्सन, प्रसून कथले, विद्यार्थी नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या बातम्या जेव्हा देशभरात गाजू लागल्या, तेव्हा माझ्या मनातही एक मोठा धक्का बसला होता. माझे वास्तव्य अकोला शहरातील मलकापूर परिसरात आहे. यापूर्वी झालेल्या नीटच्या परीक्षेत मला ६९० गुण मिळाले होते, त्यामुळे मी खूप आनंदित होतो. मात्र, देशभर झालेल्या पेपरफुटीच्या गोंधळामुळे ती परीक्षा रद्द झाली आणि पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. या निर्णयाने देशभरातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आले होते, या संपूर्ण तयारीदरम्यान मी स्वतःला सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवले होते. माझ्याकडे स्वतःचा मोबाइल फोनही नव्हता. मला कधी मित्रांशी किंवा शिक्षकांशी बोलायचे असल्यास मी माझ्या आईचा मोबाइल वापरत असे. कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर माझे खाते नव्हते. प्रसून कथले, विद्यार्थी या निर्णयामुळे काही काळ मीसुद्धा अस्वस्थ झालो. परंतु मी ठरवले की जे झाले ते विसरून जायचे. मी अजिबात दडपण घेतले नाही आणि स्वतःला सांगितले, “न डगमगता पुन्हा एकदा मैदानात उतरायचे!’. मी अभ्यासाची लय कायम ठेवली आणि नव्या आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेलो. मोबाइल तसेच सोशल मीडियापासून लांब राहिलो. यामुळे मी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकलो. अखेर पहिल्याच अधिकृत प्रयत्नात ७२० पैकी ६४२ गुण मिळवून मी माझ्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वी झेप घेतली आहे. सोशल मीडियापासून अंतर; मोबाइलही नाही नियमित क्लासेस व सेल्फ स्टडीही केली या संपूर्ण प्रवासात मी चार सूत्रांवर सर्वाधिक भर दिला. दररोज १३ ते १४ तासांचा नियमित अभ्यास. वेळेचे काटेकोर नियोजन. सातत्याने प्रश्नपत्रिकांचा सराव आणि स्वतःच्या चुका शोधून त्यात केलेली सुधारणा. क्लासमध्ये मला योग्य मार्गदर्शन मिळाले. पण त्याचसोबत मी स्वतःच्या अभ्यासावर म्हणजेच ‘सेल्फ स्टडी’वर सर्वाधिक भर दिला. नियमित उजळणी आणि सततच्या सरावामुळे माझी तयारी अधिक भक्कम होत गेली.
Source link
दिव्य मराठी विशेष:रोज 13-14 तास अभ्यास करत मिळवले 642 गुण